दुर्गादैत्य वानखेड रोड वर रेतीचे, भररस्त्यावर भरमसाठ ढीगारं …!


अपघाताची शक्यता मात्र स्थानिक प्रशासन निद्रावस्थेत
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Aug 2023, 1:47 PM
   

स्वप्निल देशमुख : संग्रामपूर : तालुक्यातील वानखेड नदीपात्रा मधुन अवैध रेती तस्करीची वाहतूक , मोठ्या प्रमाणात सर्रास होत असून. अवैध रेती तस्कर  खुलेआम साठवून ठेवत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे तर स्थानिक महसूल प्रशासन भररस्त्यावर असलेल्या अवैध रेती साठवणुकीबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. 
स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस विभाग निद्रावस्थेत की अर्थपूर्ण व्यवहाराने शांत बसलेत याची खमंग चर्चा सर्वत्र बघायला मिळत आहे. अवैध रेती तस्करी संदर्भातील वृत्तपत्रामध्ये वारंवार प्रकाशित होणाऱ्या बातम्यांनी सुद्धा, गेंड्याची कातडी धारण केलेल्या स्थानिक प्रशासनावर कुठलाही प्रभाव होतांना दिसून येत नसून एन्ट्री स्वरूपात होणाऱ्या अर्थपूर्ण व्यवहारातून  रेती तस्करांचे हितसंबंध जोपासले जात असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून निदर्शनास येत आहे. प्रशासनातील काही लाचखोर अधिकारी, कर्मचारी अवैध रेती तस्करीतून मिळणाऱ्या मिळकतीवर लक्ष ठेऊन रात्रपाळीचे “कर्तव्य बजावत” असल्याने अवैध रेती तस्करीला चालना मिळत असल्याचे सर्वसामान्याकडून चर्चीले आहे. अवैध रेती तस्करीतील अश्या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे आता नागरिकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

वरिष्ठअधिकारी यांनी तहसीलदार टोंपे यांना योग्य समज द्यावा!
जिल्ह्यात कोनत्याही नदीनाल्याचा लिलाव झालेला नाही तरी सुद्धा संग्रामपुर तालुक्यातील नदीनाल्यातुन रेतीचे उत्खनन करुन मोठमोठ्या रेती साठ्यावरुन बाहेर जिल्ह्यात भरधाव वेगाने रेतीची वाहतुक केली जाते आशाच एका वाहनाने वानखेड रोडवर रेती खालीकरुन रस्त्यात अरथळा निर्माण केला त्या बंदल सामान्य नागरिक असो या पत्रकार यांनी तहसीलदार टोंपे यांना फोन केल्यास फोन घेतनाहीत आणि उपविभागीय अधिकारी काळे साहेब यांना फोन करताच त्यांचेकडून महसूलची होनारी लुट थांबवण्यासाठी फोन करनारे नागरीकांचे समाधान करत कार्यवाहीचे आश्वासन दिले जाते हे विशेष.

    Post Views:  241


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व