आपला राष्ट्रध्वज आणि गान राष्ट्राचा सन्मान रक्षणाची आठवण देणारे


मॉ जिजाऊ वाचनालय खडकी येथे स्वातंत्र्य दिन साजरा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Aug 2025, 9:51 AM
   

अकोला :  मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालय न्यु महसुल कॉलनी, खडकी बु. अकोला येथे १५ ऑगस्ट ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिजाऊ वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव वर यांनी स्वातंत्र्यदिन महोत्सवाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक एकनाथजी शिरसाट होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये से.नि.तहसीलदार आत्माराम तेलगोटे, से.नि. मंडळ अधिकारी ज्ञानदेव खंडारे, भारतजी ठोंबरे, वासुदेवराव काकडे साहेब, जिल्हाधिकारी कार्यालयातील से.नि.कर्मचारी रत्नाकर भुजाडे, समाजसेवी सुभाष वानखडे, रमेश बदरखे, युवा कार्यकर्ता मंगेश झिने, दिनेश सोनोने, सुरेखा सोनोने, मनिषा भुजाडे, मिनाक्षी शेगोकार, जयश्री झिने, विद्या अंभोरे,सार्थक, अजिंक्य, आदित्य, रोशन, अनूजा समृद्धी, ईश्वरी, मंजिरी आदींची उपस्थिती होती. स्वातंत्र्य हे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या धाडसाचे आणि बलिदानाचे अभिमानाने स्मरण करतो ज्यांनी आपल्याला स्वतंत्र देशात राहता यावे म्हणून संघर्ष केला. आपला राष्ट्रध्वज आणि गान आपल्याला आपल्या राष्ट्राच्या सन्मानाचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देतो.  १५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या शूरविरांचा आदर करणारा आहे.  भारताचे स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटीशांच्या गुलामुगिरीतून मुक्त होऊन भारताला स्वत:चे निर्णय घेण्याचा, स्वत:च्या कायद्याचे पालन करण्याचा, देशाचे प्रशासन चालविण्याचा संपूर्ण अधिकार म्हणजेच स्वातंत्र्य होय. असा विचार मान्यवरांनी व्यक्त केला. ़कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश झिने यांनी मानले. मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    Post Views:  28


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व