शिवविचार घरोघरी पोहोचवणे काळाची गरज...! सौरभ वाघोडे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2024, 10:23 AM
   

अकोला -गणेश उत्सवा निमित्ताने उकळी बाजार येथे जय हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सौरभ वाघोडे यांच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बोलत असताना त्यांनी गणेश उत्सव हा फक्त डीजेवर नाचून साजरा न करता विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा केला पाहिजे. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता युवकांनी प्रयत्न केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त डोक्यावर नाही तर त्यांचे विचार चरित्र हे डोक्यात रुजवण्याची करण्याची गरज आता आहे. महिलांना मातेसमान वागणूक देणारा, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा जाणता राजा जगाच्या पाठीवर फक्त शिवछत्रपती हेच होते. सद्यपरिस्थितीत तरुण हे व्यसनाधीन होत आहेत, प्रेमप्रकरणातून आत्महत्या करीत आहेत, राष्ट्र बलवान करण्याकरिता तरुण बलवान होणे गरजेचे आहे व तरुण बलवान होण्यासाठी त्यांनी निर्व्यसनी होणे गरजेचे आहे, प्रेम करायचे असेल तर आपल्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या स्वतः फाटके कपडे घालून आपल्याला नवीन कपडे देणाऱ्या आपल्या आई-वडिलांवर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले वाघोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. पुजाबाई सोळंके सरपंच उकळी,सुधीर मार्के सरपंच वागरगांव,गणेश रोठे,पदमाकर वाघ उप सरपंच,दीपक काळे,राजेश पाटील काळे पोलीस पाटील,प्रमुख उपस्थित दयाराम पाटील घुंगळ,गनेश पाटील रोठे मनोहर वाग,मडंळाचे अध्यक्ष श्री पवन घुंगळ,बंटी वाघ, राधेश्याम घुंगळ,चंद्रकांत मार्के, गजानन महल्ले,संदीप वाग, ज्ञानेश्वर येउतकार, अजय नागे, व समस्त गाव करी मडंळी उपस्थित होते...!

    Post Views:  131


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व