११ महाराष्ट्र बटालियन येथे सी. ए. टी. सी. कॅम्पला सुरवात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Aug 2023, 11:54 AM
   

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अंतर्गत दि. १ ऑगस्ट  ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सी. ए. टी. सी. कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वामध्ये या कॅम्पला सुरवात झाली. या कॅम्पमध्ये अकोला जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांतील ज्युनिअर व सिनिअर डिव्हिजनचे तीनशे पेक्षा अधिक जे.डी., जे.डब्ल्यू., एस.डी. व एस.डब्ल्यू. एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असून हा कॅम्प दहा दिवस चालणार आहे. 
या कॅम्पमध्ये पिटी परेड, ड्रिल, मॅप रीडिंग, वेपन ट्रेंनिंग, पॉईंट टू टू रायफल फायरिंग, क्षेत्र व युद्ध कौशल्य, नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकास, सैनिकी शिस्त, नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक ज्ञान, आरोग्य व स्वच्छता, आत्मरक्षा, पर्यावरण जागरुती, राष्ट्रीय एकता व अखंडता, योगा, नेतृत्व विकास व सांस्कृतिक कार्यक्रम या महत्त्वपूर्ण अशा बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन येथील सर्व पी. आय. स्टॉफ व कर्मचारी परिश्रम घेत आहे.

    Post Views:  157


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व