तुला कळणार नाही
व्यथा हळव्या मनाची
किती घाव विरहाचे
तूच हाक अंतरीची...१
किती वेदना असह्य
बाळा साहल्या जीवनी
रात्री मला जागवून
हट्ट तुझे पुरवनी...२
तुला नित्य जोजवले
दुःख सारे लपवून
गीत गायले मुखाने
राणी निद्रा आर्जवून....३
सुखी व्हावा बाळ राजा
हीच हाक माऊलीची
क्षण दुःखाचे न यावे
होवो पहाट सुखाची....४
दूर टाकून गेलास
मूक शब्द हे मायेचे
श्वास माझा तूच असे
ध्येय गाठ तू यशाचे..... ५
घास मुखी भरवला
भूक मारून तुजला
जगण्याचा आधार तू
कसे समजावू तुजला ....६
अनिता देशमुख
नांदुरा(बुलढाणा)
हमू. कल्याण
Post Views: 300