चिंचगाव या माझ्या माहेरी झालेल्या सन्मानाने मी भारावून गेले आहे -प्रख्यात लेखिका प्रा.डॉ.दीपाली तंबाखे-सोसे


यवतमाळ जिल्ह्यातील चिंचगावची पहिली कन्या डॉक्टरेट(पीएच.डी.) झाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला जाहीर सत्क
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Jan 2026, 1:49 PM
   

चिंचगाव - माझा जन्म,माझं बालपण, माझी लग्नापूर्वीची कर्मभूमी सगळेच चिंचगाव या गावात झालेले. या मातीचा लळाच वेगळा आहे. ही माझी माहेरची भूमी.ही सारी माझी माहेरची माणसं. नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मला डॉक्टरेट (पीएच.डी.) जाहीर केल्यानंतर माझ्या माहेरी होणार हा सन्मान बघून मी खरोखरंच भारावून गेले आहे,अशा भावूक शब्दात प्रख्यात लेखिका, व्याख्यात्या,मराठी भाषेच्या गाढ्या अभ्यासक प्रा.डॉ.दीपाली तंबाखे-सोसे यांनी काढले आहे.
   त्या चिंचगाव येथे ग्रामस्थ आणि गुरुदेव सेवा मंडळ, चिंचगाव यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित भव्य समारंभात सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. त्यांना माहेरची साडी,शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह,मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. या समारंभाला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शिवदास महाराज शृंगारे यांचाही महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या समितीवर निवड झाल्याप्रसंगी स्मृतीचिन्ह, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या वतीने भव्य प्रमाणात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतीताई उगले, सरपंच संध्याताई राऊत, उपसरपंच पद्मादादा राऊत, दिगंबर नागरगोजे, भगवंतराव राऊत,विठ्ठलआप्पा तंबाखे, रामेश्वरआप्पा तंबाखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
    यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार शिवदास महाराज शृंगारे यांनी आज चिंचगावच्या सुकन्या दीपालीताई या शिक्षण,साहित्य,सांस्कृतिक, अभिनय,समुपदेशन,प्रकाशन अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत.दीपालीताईंप्रमाणे गावातीलच नव्हे तर, परिसरातील प्रत्येक लेकीने हा आदर्श घेऊन शिक्षण तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपले नावलौकिक मिळवले पाहिजे,असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मानेकर यांनी तर आभार प्रदर्शन राऊत सर यांनी केले.

    Post Views:  51


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted