पाटील समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा 13 नोव्हेंबर रोजी


उपवर मुला-मुलींचे परिचय पत्र पाठविण्याचे आवाहन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Sep 2022, 6:36 PM
   

अकोला  : पाटील समाज अकोलातर्फे उपवर वधू वरांचा भव्य असा परिचय मेळावा रविवार, दि. 13 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्याच्या निमित्ताने एक सुंदर अशी योगायोग नामक पुस्तीका प्रकाशीत करण्यात येणार असून त्यात उपवर मुला-मुलींचा परिचय कलर फोटोसह प्रकाशित करण्यात येणार असून त्यात उपवर मुला-मुलींचा परिचय कलर फोटोसह परिचय पत्र न्यु अनंत मेडीकल स्टोअर्स रतनलाल प्लॉट, अकोला किंवा जानोरकर मंगल कार्यालय रिंगरोड, कौलखेड, अकोला येथे शक्य तितक्या लवकरजमा करावेत, असे आवाहन आयोजकांसह योगायोग पुस्तीकेचे संपादक प्रदीप खाडे यांनी केले आहे. 
या मेळाव्याच्या आयोजनाकरीता संपन्न झालेल्या समाजाच्या कार्यकारिणीच्या सभेत  अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचेसह उपाध्यक्ष विनायकराव शेळके, रघुनाथराव खडसे, सचिव दिनकरराव सरप, कोषाध्यक्ष राजेन्द्र मोहोकार, पाटील समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चोरे, उपाध्यक्षा सुषमाताई निचळ, गुणवंतराव जानोरकर, दयाराम मेतकर, विक्रम जानोरकर, प्रा. दत्तात्रय भाकरे, प्रविण काळे, प्रदीप चोरे, रामेश्वर सपकाळ, गजानन डिवरे, महिला संघटीका, माधुरीताई क्षीरसागर, शैलेन्द्र काळे, ओम अमानकर, दिनकरराव ओळंबे, ज्ञानदेव वनारे, गजानन पुंडकर, मधुकर महल्ले, डी. आर. वाकोडे, निलेश पवित्रकार, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याच सभेत महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुषमाताई निचळ यांची राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडी शहर अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला, असे पाटील समाजाचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे यांनी कळविले आहे. 

    Post Views:  235


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व