अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि विवेकानंद इंग्लिश स्कूल अकोला तर्फे मोफत डेंटल चेकअप कॅम्प


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Mar 2024, 8:14 AM
   

शाळकरी विद्यार्थ्यांना चाॅकलेट खाण्याची सवय असते. मुलं दातांची योग्य निगा राखत नाही, त्यामुळे दात किडणे, दाताची योग्य वाढ न होणे, दातावर दात येणे, दातात फट निर्माण होणे,वेडवाकडे दात होणे, या समस्यांना शाळकरी मुलं- मुली हे त्रस्त असतात. या शाळकरी मुलांच्या दातांच्या आरोग्य तपासण्यासाठी अकोल्यातील अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाने शाळकरी मुलांच्या दातांची मोफत तपासणी सुरु केली आहे. लहान मुलांसाठीच्या या महत्वपुर्ण उपक्रमात आज विवेकानंद इंग्लिश हायस्कूल अकोला शाळेच्या ८०० मुलांचे दातांची तपासणी महिला दिनाच्या निमित्ताने दातांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.  उपक्रमात शाळेचे अध्यक्ष श्री.निशीकांत पुजारी ,श्री.अनिल पिपंरखेडे, श्री.रवींद्र अभ्यंकर, अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव, दिलीप काका देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, प्रा.रश्मी देव, इंडियन डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ.सचिन वानखडे, सचिव डाॅ.सुनिल मारवाल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता कोकिळ,सौ.नयना हातवळणे,सौ.मिनल कापशे आदींची उपस्थिती होती. 
      शाळकरी मुलांच्या दातांचे आरोग्य तपासणीत इंडियन डेंटल असोसिएशनने देखील मोठी मदत केली असून त्यांच्या संपुर्ण टिमच्या वतीने या उपक्रमात विविध शाळांमध्ये दातांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. आजच्या फ्रि डेंटल कम्प या उपक्रमात  डाॅ. तुषार रोठे, डाॅ.योगेश साहू, डॉ.अभिषेक तिडके,डाॅ.सचिन वानखडे, डाॅ. पराग इंगोले, डाॅ.झुबेर अहमद, डाॅ. सुनील मारवाल, डाॅ. मनिष पदमने, डाॅ.निलेश मालोडे, डॉ. शकुन सराफ, डॉ. पूजा चावला मोटवानी,डाॅ.विक्रांत भागवत, डॉ.सलोनी काटे, डॉ.अमोल गायधनी डॉ. ऋषिकेश कडू, डॉ.शुभम मानधने,डॉ. विजय शर्मा,डॉ.अंतरिक्षा दौड,डाॅ.दुष्यंत आलिमचंदानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  शाळकरी मुलांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमात यंदा हजारो विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी व उपचार सल्ला त्यांना देण्यात येणार आहे. आजच्या डेंटल चेकअप च्या महिला दिनाच्या निमित्ताने  शाळकरी मुलांनी अतिशय उत्स्फुर्तपणे या शिबिराला प्रतिसाद दिला. इतकेच नाही तर पालकांनी देखील मुलांच्या दाताच्या आरोग्यासाठी अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाचे स्वागत करत सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल  शाळेच्या शिक्षकवृंद तथा संपुर्ण शाळेचे मोलाचं सहकार्य लाभले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश देव, जयंत सरदेशपांडे, दिलीपकाका देशपांडे, प्रकाश जोशी, रामहरी डांगे,राम उमरेकर, राजेंद्र गुन्नलवार, विजू वाघ,भास्कर बैतवार, ललंन मिश्रा, नरेंद्र परदेशी,अजय शास्त्री, मोहन काजळे, बबलू तिवारी, राजू कनोजीया, निलेश पवार, सुधीर मस्के,दिपक शुक्ला,सोनु मोटे,अक्षय मिश्रा,  प्रसाद देशपांडे  रमेश खिलोसिया,आदींची उपस्थिती होते.

    Post Views:  201


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व