तारापूर एमआयडीसी मधील घनकचऱ्याचा ट्रक पालघर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Oct 2022, 7:37 PM
   

पालघर -(श्री. संतोष घरत )- तारापूर बोईसर येथील एमआयडीसी मधील आरती ड्रग्स प्लॉट नंबर  198 ह्या कारखान्यातील घातक रासायनिक पदार्थ वाहून ट्रक MH48AY7616 ह्याच्यावर कारवाई होईल का?. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषणाचा विषय ऐरणीवर असतानाच बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने घातक रासायनिक घनकचरा वाहून नेणारा  ट्रक सोमवारी रात्री 9=30 च्या सुमारास पकडून तो  कासा पोलीस स्टेशन मध्येआज मंगळवार संध्याकाळपर्यंत उभा असल्याचे निदर्शनास आले. सदर बाबतीत विचारणा केली असता प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र दिल्याचे सांगण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल.       हा ट्रक कासा पोलीस ठाण्याजवळ उभा असल्याने ह्या ट्रक मधील घातक रासायनिक पदार्थाची गळती होत असल्याने त्या ठिकाणी दुर्गंध पसरून  रोगराई वाढण्याची शक्यता आहे .                    सदर ट्रक वरील चालक अहमद यांच्याशी संवाद साधला असता हा ट्रक रासायनिक घातक द्रव्य घेऊन राजस्थानला खाली करणार असल्याचे सांगण्यात आले.             सदर घटनेकडे स्थानिक गुन्हे शाखा, प्रदूषण नियंत्रण मंडळ  व ह्या प्रकरणाशी निगडित असणाऱ्या शासकीय यंत्रणा काय कारवाई करते हे पाहणे औचित्याचे   ठरेल.

    Post Views:  404


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व