आळंदीत फुटपाथवर चालतोय पोस्टाचा कारभार.
आळंदी देवाची :- देवाच्या आळंदीत पोस्ट ऑफीसचा कारभार अक्षरशः फुटपाथवरच सुरु आहे असल्याचे चित्र म्हणजे या विभागाच्या गलथान कारभाराचे प्रदर्शन आहे.या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक खातेदाराला ऊन, वारा, पाऊसापासून निवाऱ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. गर्दीचे प्रमाण जास्त, आतमध्ये मनुष्यबळ कमी, वेळेच बंधन, खिडक्या तीनच. पण तिनही खिडक्या पूर्ण न उघडता अर्धी खिडकी उघडी ठेऊन चाललेला कारभार, अशा प्रकारची दुरावस्था येथील पोस्ट ऑफीसची आहे.ही परिस्थिती लवकरात लवकर बदलावी यासाठी प्रयत्न करावेत आणि सुलभ सेवा सुरू करून होणारा मन:स्ता आणि त्रास वाचवावा अशी आळंदी मधील नागरीकांची मागणी आहे.
Post Views: 45