गोरेगावमधील एका जनावरात लंपी प्रादुर्भाव आढळला


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Sep 2023, 6:42 PM
   

अकोला, दि. 25 :  मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावातील एका बैलात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने तेथील संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश   पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.

    Post Views:  166


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व