आनंदभोगी
आनंद जीवनाचा ,भोगण्या अधीर झालो ।
भेटून जनास सार्या , प्रसन्न आज झालो ।।
नव्हतेच पाहिले मी , अनोख्या या जगाला ।
मानसात राहूनि मी , धन्य आज झालो ।।
डोंगर दर्या कपारा , पाहून रमणीय वाटे ।
इथल्या निसर्ग सृष्टित, राहून दंग झालो ।।
काय भरवसा कुणाचा , बाशिंग बांधण्याचा ।
सांगू कसे कुणाला , मी कधीचाच बाप झालो ।।
जन मानसात शिकलो , प्रेम आदर करायाचा ।
विश्वास जिंकून मनाचा,आनंदभोगी झालो ।।
शब्दांकण ©®©
विश्वासराव देशमुख
शेगाव { निॅबा }.
जयगुरू
Post Views: 325