पुण्यातील महर्षी कर्वे संस्थेत क्रिडा स्पर्धा संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Sep 2023, 7:50 PM
   

पूणे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थांतर्गत ऊर्जा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर राघवजी अष्टेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्रजी देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य व क्रीडा समिती प्रमुख किरणजी बराटे, संस्थेचे सचिव डॉ.पी
व्ही.एस शास्त्री , विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे, सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
सूर्यनमस्कार, योगासने, बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण क्रीडा समिती अध्यक्ष किरणजी बराटे, उपसचिव प्रदीपजी वाजे , मुख्याध्यापक विष्णू मोरे ,   शेखर कुलकर्णी,      प्राचार्या सविता रानडे, मुख्याध्यापिका शोभा कांबळे, मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य, रमेश तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
वाई ,सातारा, पुणे, कामशेत प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आयोजक  शाळा  विद्यापीठ हायस्कूलने स्पर्धेचे नियोजन केले होते. मनोहर निकम, गौरी गोळे,स्मिता जाधव , संध्या आवेकर, वैशाली सैंधाणे, स्नेहा वाघमारे, रेश्मा देवकाते, तेजस्विनी निरगुडे, पल्लवी अभंग, कबुले, आदलिंगे, कांबळे, आगवणे, बिरजे, काशीद सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी झाल्या.

    Post Views:  175


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व