दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स,अकोला एन.सी.सी. विभागाच्या कॅडेट्सने आझादीचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत
लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शनासाठी पथनाट्य कार्यक्रम आयोजित केला. हर घर तिरंगा या मोहिमेमागील संकल्पना लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना बिंबवणे आणि लोकसहभागाच्या भावनेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आहे. 11 महाराष्ट्र बटालियन चे एन.सी.सी. अकोला चे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती. एल. आर. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्या द्वारे एन.सी.सी. कॅडेट्सनी भारताच्या राष्ट्रध्वजाचे, देशातील लोकांसाठी खूप महत्त्व असल्याचे सांगितले. भारताचा राष्ट्रध्वज शांतता, प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. भारताला स्वतंत्र करताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण गमावले. तिरंगा त्यांच्या अमूल्य बलिदानाचे प्रतिनिधित्व करतो. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील.
या पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत भारतीय ध्वज संहितेचे पालन करून प्रत्येक भारतीयांच्या घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून नागरिकांच्या मनात राष्ट्रध्वजाचा आदर वाढावा ही यामागील संकल्पना आहे. या पथनाट्या मध्ये कॅडेट मिनल रेड्डी, कॅडेट वैष्णवी ढेंमरे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट अवंतिका खंडार, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट स्नेहल गायकवाड़, कॅडेट नैना टोंगऴे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट कार्तिक लाडगे, कॅडेट सागर वानखेड़े आणि कॅडेट हेमंत पिंपले सहभागी होते. तसेच या पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी कॉर्पोरल श्याम ढोरे, कॉर्पोरल जयश्री हरसुलकर, लान्स कॉर्पोरल शिवम् देशमुख, कॅडेट प्राजक्ता नारखेडे, कॅडेट साक्षी पराते, कॅडेट सुहानी गवई, कॅडेट शिवानी अवातिरक, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट पूर्वा देवघरे, कॅडेट श्रिकांत वाडोकार, कॅडेट सर्वेश धांडे, कॅडेट ओम हिरनवाडे, कॅडेट ओम डांगे, कॅडेट हर्षल पाल, कॅडेट अरविंद कुमार यादव, कॅडेट रितिक आगरकर, कॅडेट ॠषिकेश शैलार, कॅडेट सागर वानखेड़े, कॅडेट हेमंत रसाल, कॅडेट सुरज सरकटे, कॅडेट नागेश कचरे, कॅडेट रितिक आगरकर, कॅडेट ॠषिकेश शेलार, कॅडेट प्रथमेश तालेकार, कॅडेट अभय पारधी, कॅडेट साहिल बहाड या सर्व एन.सी.सी. कॅडेटने परिश्रम घेतले. या पथनाट्याचे सादरीकरण करतांना महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 374