डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आजही प्रेरणादायी... डॉ. रवींद्र भोळे
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
09 Jul 2023, 12:17 PM
पुणे : राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी स्वाभिमान व देश सन्मान जागृत करण्यासाठी ,भारतीय संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी ,डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी समर्पित भावनेने राष्ट्रसेवा केली. ते सिद्धांतवादी ,राजनीतिज्ञ होते. त्याचप्रमाणे मानवतेचे उपासक, महानचिंतक ,शिक्षणतज्ञ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करणे म्हणजे विभूती पूजा आहे. त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक ,डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच पुणे यांच्यावतीने त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे आपले मत व्यक्त करताना डॉ.रवींद्र भोळे म्हणाले की समर्पित भावनेने विविध क्षेत्रांमध्ये निष्काम कर्मयोगी कार्य करणे म्हणजेच अशा विभूतींचे स्मरण करणे होय. याप्रसंगी श्री गंगाधर पाटील ,डॉ. सलील पाटील, सौ किरण पाचपांडे, डॉ. रवींद्र चौधरी, राजू परदेशी ,हनुमंत वल्लीपुरे, अविनाशजी हळबे, सुनील तुपे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, अमोल भोसले ज्येष्ठ पत्रकार, अक्षय रोडे महाराज, तसेच डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 76