करोडोंच्या खर्चाला चिखलाचा मलिदा...


वाढवणला जाणारच नाही तर पालघरला येण्याचा अट्टाहास का ? मोदीजी बोलो मन की बात
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2024, 8:44 AM
   

संतोष घरत- जिल्हा प्रतिनिधी 
पालघर! जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरामध्ये  वाढवण  बंदराचा समावेश असलेल्या  बंदराचा येता. ३० ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला संपूर्ण जिल्हा प्रशासनाला कामाला जुंपले असून  सभा मंडपासाठी १५ कोटीचा खर्च केला जाणार असून मैदान बनविण्यासाठी, गाडी- घोडा वाहतुक व इतर सर्व सोई करिता ५० कोटीचा जवळजवळ खर्च येणार असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे .
ज्या ठिकाणी वाढवण बंदर होणार त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी जाऊन भूमिपूजन करणार नाही ते पालघर जिल्हा मुख्यालय येथील मैदानावरुन करणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. असे असताना दिल्लीतून देखील ऑनलाइन भूमिपूजन करून वेळ पैसा व नागरिकांना होणारा त्रास पंतप्रधान मोदी नक्कीच वाचवू शकले असते  मात्र कर भरणाऱ्या करदात्यांच्या व जनतेच्या पैशावर सध्या राज्य आणि केंद्र सरकार उधळपट्टी करत आहे हे मात्र तितकेच सत्य आहे.  आज ढेकाळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आलेल्या प्रमुख सचिव, तसेचइतर मंत्री महोदयांना पत्रकार बंधूनी काही प्रश्न विचारले असता त्यांना त्याचे साधे उत्तरही देता आले नाही. व पत्रकार परिषद आटपत पळ काढण्याचा प्रयत्न हे  अधिकारी करत होते.
वाढवण बंदराचे जर भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करायचे होते, तर दिल्लीवरूनही ऑनलाइन केले असते तर वायफळ जाणारा करोडचा खर्च, सामान्य जनतेला होणारा वाहतूक कोंडीचा त्रास, तसेच पोलीस प्रशासनाला होणारा त्रास व इतर येणाऱ्या अडचणीला  सामोरे जावे लागले नसते.

    Post Views:  31


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व