आतापर्यंत गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले मात्र इथून पुढे भगतसिंग यांच्या मार्गाने आंदोलन करणार


राजाभाऊ कदम, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
 संजय देशमुख  07 Dec 2021, 8:55 PM
   

दौंड : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे तोडलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते मात्र राजाभाऊ कदम यांची प्रकृती खालावत चालल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने स्वाभिमानी पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष अमरसिंह कदम यांना देऊळगाव येथील उपोषण स्थळी भेट देण्यासाठी सांगितले मात्र त्याठिकाणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांची परिस्थिती खालावली होती त्यामुळे पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर आणि पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष अमरसिंह कदम यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजाभाऊ कदम यांच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे त्यामुळे त्यांनी अन्नत्याग मागे घ्यावी अशी विनंती करण्यात आली आतापर्यंत महात्मा गांधी यांच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आता इथून पुढे भगतसिंग यांच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणला देण्यात आला यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला यावेळी महावितरणचे अधिकारी देखील उपस्थित होते. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष अमरसिंह कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांना महावितरणच्या 2003 सालच्या कायद्याविषयी प्रश्न विचारले मात्र अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.  महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांन पासून खालच्या वायरमन पर्यंत वसुलीसाठी कमिशन ठरवून दिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्यासाठी अधिकारी तत्परता दाखवत आहे असा आरोप करण्यात आला.
दौंड तालुक्यातील पूर्व भागात गेल्या 13  दिवसांपासून कृषी पंपाचे कनेक्शन महावितरणने बंद केले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे याचा शासनाने त्वरित कृषी पंपाचा खंडित वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करावा

    Post Views:  277


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व