कोरोना विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती नेमकी किती दिवस कोरोनाशी लढण्यास सक्षम राहते याचा अभ्यास आता भारतात करण्यात आला आहे. भारतात करण्यात आलेल्या संशोधनानुसार लस घेतलेल्या १० पैकी ३ जणांमध्ये लसीमुळे निर्माण झालेल्या रोगप्रतिकार शक्तीचा परिणाम जवळपास ६ महिन्यानंतर संपुष्टात येतो असं दिसून आलं आहे.हैदराबादस्थित AIG हॉस्पीटल आणि एशियन हेल्थकेअरनं मिळून कोरोना विरोधी लसीतून मिळणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीबाबत संशोधन केलं. यात दोन्ही डोस घेतलेल्या एकूण १,६३६ जणांचा समावेश करण्यात आला होता.कोरोना लसीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीची माहिती जाणून घेण्याच्या उद्देशानं एक संशोधन करण्यात आलं. बुस्टर डोसची खरंच गरज कोणत्या वयोगटाला आहे याचीही माहिती यातून मिळाली आहे, असं AIG रुग्णालयाचे चेअरमन डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी म्हटलं आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांमध्ये अँटिबॉडी स्तराची माहिती यात घेण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीचं प्रमाण 15 AU/ml इतकं आढळून आलं त्यांच्यातील लसीचा प्रभाव संपुष्टात आल्याचं समजावं.याशिवाय ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीचा स्तर 100 AU/ml इतका आहे. त्यांच्यात लसीमुळे निर्माण झालेली अँटिबॉडी अजूनही आहे हे लक्षात येतं, असा अंदाज लावता येऊ शकतो. लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटिबॉडीचा स्तर किमान 100 AU/ml तरी असायलाच हवा, असंही डॉ. रेड्डी म्हणाले.
Post Views: 274
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay