अकोला - जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे संविधानदिनानिमित्त आयोजित त्रुटी पूर्तता शिबिरात 75 व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.
सामाईक परीक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. हे लक्षात घेऊन या कामाला गती देण्यासाठी समितीतर्फे संविधानदिनानिमित्त त्रुटी पूर्तता शिबिर राबविण्यात आले. समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, उपायुक्त व सदस्य अमोल यावलीकर, सदस्य सचिव मनोज मेरत यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली.
प्रलंबित अर्जांची छाननी करण्यात येऊन अर्जात त्रुटी आढळलेल्या अर्जदारांशी संपर्क साधण्यात आला व त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मिळवून सर्व त्रुटींची पूर्तता करून घेण्यात आली. शिबिराला अर्जदारांनी उत्तम प्रतिसाद दिला व एकूण 75 व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.
Post Views: 4
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay