सुनंदा पंजाबराव वर वृद्ध साहित्यिक कलावंत समितीकडून समता नायक पुरस्काराने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Oct 2025, 10:26 AM
अकोला : साप्ताहिक नारी ललकारच्या कार्यकारी संपादिका आयुष्यमती सुनंदा पंजाबराव वर यांचा वृद्ध साहित्यिक कलावंत समितीकडून त्यांचेसह दोन्ही उभयतांचा सामाजिक कार्याबद्दल, गायक कलावंत म्हणून समता नायक पुरस्कार देवून आकर्षक मोमेंटो, शाल, प्रमाणपत्र सह अशोक वाटीका अकोला येथे सन्मानित करण्यात आले. ़कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रविंद्र गवई होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये वृद्ध साहित्यिक कलावंत राजर्षी शाह महाराज समिती चे अध्यक्ष जि.प. अकोला विठ्ठल खापरकर महाराज व सर्वश्री सदस्य ़ज्येष्ठ कलावंत व शाहीर मुरलीधर देविदास लोणाग्रे महाराज तेल्हारा, गुरुदास शंकरराव गावंडे महाराज अकोला, महादेव किसन निमकर्डे महाराज पातुर, गोपाल महाराज रेवस्कर बाळापूर, श्रीरंग पांडूरंग पातोड अकोट, सुरेश पुंडलीक वानखडे मुर्तिजापूर, शंकर अमृतराव काकड बार्शिटाकळी, सागर मोहनराव घाटे महानगर अकोला, गिताबाली मनिष उजवणे महानगर अकोला ही जि.प. अकोला, उल्हास मोकळकर (विस्तार अधिकारी प. स. अकोला), संतोष धरमकर, सारिपुत्त वानखडे (से.नि.भारतीय जवान) जि.प.ची कलावंत समिती सदस्य उपस्थित होते. सुनंदा पंजाबराव वर ह्या वर्हाड विकास संस्थेच्या संचालिका असून गेल्या २००५ पासून कार्यक्रम आयोजीत करणे, गायक कलावंतांचा, सन्मान करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करणे, राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचे काम करीत आलेल्या आहेत, तसेच त्या साप्ताहिक नारी ललकारच्या कार्यकारी संपादिका असून या वृत्तपत्राचे माध्यमातून जनजागृती करत आलेल्या आहेत. सदरहू कार्यक्रमामध्ये समस्त अकोला जिल्हा कलावंत समिती यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हाभरातील वृद्ध साहित्य गायन, वादन, गित संगितकार आदी कलावंताचा मोमेंटो, शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदरहू कार्यक्रमाचे आयोजन वर्हाड विकास बहुउद्देशिय क्रीडा व शिक्षण मंडळ खडकी बु.अकोला, कल्याणी बहुउद्देशिय क्रीडा, शिक्षण मंडळ भौरद,(अकोला), भारतीय बहुउद्देशिय क्रीडा मंडळ सोनाळा, एकता पत्रकार परिषद, अकोला तसेच बहुजन साहित्य कलावंत फाऊंडेशन, अकोला यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक : डी. जे. वानखडे (संपादक : समता नायक) देवानंद ज. अंभोरे, सुभाष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बहुजन साहित्य कलावंत फाऊंडेशन अकोलाचे अध्यक्ष तथा नारी ललकारचे संपादक पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन डी.जे.वानखडे यांनी मानले.
Post Views: 82