नवनियुक्त बेस्ट समिती सदस्यांचा जाहीर सत्कार व गौरव सोहळा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
05 Mar 2026, 11:37 AM
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमावर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर बेस्ट समितीवर सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक व मंगलमयी क्षणाचे औचित्य साधून, भाजपा बेस्ट कामगार संघ व भाजपा कामगार आघाडी मोर्चा, मुंबई यांच्या वतीने नवनियुक्त सदस्यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा आज दादर येथील वसंत स्मृती भाजपा मुंबई कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या सोहळ्याला भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा संघाचे अध्यक्ष श्री. गणेशजी हाके साहेब आणि भाजपा कामगार मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश) सरचिटणीस श्री. हनुमान अण्णा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गौरवमूर्ती सत्कारार्थी बेस्ट समितीवर निवड झालेल्या खालील मान्यवरांचा भारतीय जनता पार्टी आणि कामगार संघाच्या वतीने विशेष सत्कार व गौरव करण्यात आला. श्री. सुनील गणाचार्य साहेब (कार्याध्यक्ष - भाजपा बेस्ट कामगार संघ व संयोजक - मुंबई भाजपा कामगार आघाडी) श्री. रमाकांत गुप्ताजी श्री. संतोष मेडेकर श्री. प्रमोद वाकोळे श्री. आकाशजी राजपुरोहित श्री. अजय सिंह प्रास्ताविक आणि ज्वलंत मांडणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गजानन देविदास नागे (सरचिटणीस - भाजपा बेस्ट कामगार संघ व भाजपा कामगार आघाडी मोर्चा, मुंबई) यांनी केले. त्यांनी अत्यंत परखड शब्दांत कामगारांच्या व्यथा मांडल्या. श्री. नागे म्हणाले, गेल्या ३-४ वर्षांपासून प्रशासकीय कारभारामुळे कामगारांचे अपरिमित नुकसान झाले आहे. बेस्टचे मुंबई महानगरपालिकेत विलीनीकरण, प्रलंबित आर्थिक करार आणि ताफ्यातील बसेसची घटती संख्या हे अत्यंत कळीचे मुद्दे आहेत. आता आपले हक्काचे प्रतिनिधी समितीवर नियुक्त झाल्याने हे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
संकल्प आणि आश्वासक मनोगत सत्कारमूर्ती श्री. सुनील गणाचार्य यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, कामगारांची पगारवाढ, थकीत देणी, ग्रॅच्युइटी, मेडिक्लेम आणि आरोग्य सुविधा या बाबींना आम्ही प्राधान्य देऊ. तसेच, अध्यक्ष श्री. गणेश हाके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुंबईत आता भाजपाची सत्ता असून बेस्ट समितीमध्ये आपले बहुमत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयी- सुविधा आणि कामगारांचे हित जोपासण्याचे काम आता युद्धपातळीवर केले जाईल. गेले अनेक वर्ष जे प्रश्न प्रलंबित राहिले, ते सोडवण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे.
कृतज्ञता आणि जाहीर आभार कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी, भाजपा बेस्ट कामगार संघ आणि भाजपा कामगार आघाडी मोर्चा, मुंबई यांच्या वतीने उपस्थित सर्व कामगार बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आता एक सक्षम फळी सज्ज झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन: श्री. संतोष काटकर आभार प्रदर्शन: श्री. झुंबर जाधव विशेष परिश्रम: हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महादेव खाडे, आनंदा जरग, मुकेश इगवे, राजू लिहिणार, श्रीकांत गालांडे, दीपक कोयंडे यांसह श्री राजेश पुष्पाबेन मोहनलाल ओझा कामगार आघाडी मुंबई प्रदेश मंत्री, डॉक्टर फराद विजय अरोरा भाजपा कामगार आघाडी मुंबई प्रदेश मंत्री, नमो ग्रुप अध्यक्ष मुंबई, एंटरटेनमेंट ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष, सीमाजी चौरसिया कामगार मोर्चा कार्यकारणी सचिव ठाणे पालघर, स्नेहा मोरे वार्ड क्रमांक 69 मंडळ उपाध्यक्ष,श्री. शिवा का वदंर युवा अध्यक्ष वार्ड 69,श्री. दिनेश जी फलके साहेब, आणि भाजपा बेस्ट कामगार संघ पदाधिकारी वाल्मीक क्षेत्रे, गणेश पोटे, युवराज ठाणगे, नितीन शिंदे, संदीप सांगळे, विनोद पंडित क्षीरसागर, दीपक दीपक खलाणे, राजू वाघमारे, विजय भोसले, प्रशांत आमणे,मंगेश सांगळे, मंदार क्षिरसागर, सोहेल मुलानी, राहुल सिंह, विलास पोळ, प्रवीण मारू, देवेंद्र पूरबीया, नितेश वाघेला, विजय गुडेकर, प्रवीण सोनवणे, विजय ससाने, विनोद पाटील, राहुल पंडित राठोड, निलेश प्रकाश छल्लारे, सागर मदने, राहुल अडसूळ, परेश चिले, विठ्ठल बेहरे, भिकन मोहिते, प्रल्हाद कुंटे, दीपक चव्हाण, प्रसाद कदम, बाळासाहेब कराड, विष्णू दहिफळे, रमेश कदम,, शांताराम घाडगे, दीपक पाटील, अविनाश पाटील, संतोष शर्मा, विवेकानंगणे, अनिल यादव, गुरुनाथ घोलप याअनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार!
Post Views: 42