अकोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी


शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख यांची कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी....
 विश्वप्रभात  2024-09-06
   

(अशोक भाकरे) अकोला : सतत होत असलेल्या पावसामुळे अकोला तालुक्यातील सर्वच सर्कल मध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून नदी आणि नाल्याना आलेल्या पुरामुळे शेकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच नदीपासून अंतरावर असलेल्या शेतीमध्ये पिकांची वाढ न होणे, पुकांवर सतत च्या पावसाने बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच विविध प्रकारच्या अळीचा प्रभाव वाढलेला असल्याने सोयाबीन,कपाशी तूर लावणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षी उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील सर्व शेतकरी यांच्या नुकसानीची पाहणी करून सर्व शेतकरी यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रु ची अतिवृष्टी ची मदत द्यावी अशी निवेदनातून तहसीलदार नसल्यामुळे तालुका कृषी अधिकारी जांभरूनकार, मंडळ कृषी अधिकारी नावकर, राठोड, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुकाप्रमुख प्रा नितीन सुभाषराव ताथोड, अकोला पूर्व विधानसभा सह समन्वयक अनिल निकामी, उपतालुका प्रमुख महादेव भिसे, प स सदस्य भास्कर अंभोरे, गजानन भटकर, गोपाल भाकरे, गणेश वाकोडे, सय्यद भाई, हरिभाऊ वाकोडे,अजाबरव तायडे,  आणि परिसरातील शेतकरी यांनी निवेदनातून विनंती केली.

    Post Views:  221


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व