गुटख्यासह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Jan 2023, 8:39 AM
   

बोईसर -(संतोष घरत )- सूत्रांच्या  माहितीवरून बोईसर मध्ये लाखोचा गुटखा आल्याची बातमी सर्व प्रथम मला माझ्या मित्रांना समजताच आम्ही संशय असलेल्या इनोवा सिल्वर रंगाची कार MH48A8418 चा पाठलाग करत असताना इनोवा गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्ष्यात आल्याने त्याने मुकटटॅंक च्या बाजूला डी सी कंपनी जवळ कार उभी करून तो निघून गेला. त्या मुळे आम्हाला पूर्ण खात्री झाली की नक्की कार मध्ये आम्हाला जी माहिती मिळाली ती खरी आहे. याबाबत शहानिशा  करण्याकरिता मी पोलिसांना फोन करून सदर कार तपासण्यास सांगितले . तपासा अंति त्या कार मध्ये 16 गोणी केशर युक्त पान मसाला त्याची किंमत 6,96,960/, तसेच 16 निळ्या रंगाच्या गोणी त्या मध्ये तंबाखू असून त्याची किंमत *77,440/ व इनोवा कार   त्याची किंमत *5,00,000/ असा एकूण 12,74,400 / मुद्देमाल जप्त केला. ही गुटख्याची तस्करी करणारा फूजेल मोहम्मद खालीद शेख रा.चित्रालय बोईसर व गाडीचा ड्रायव्हर, पवन अशोक पाटील  रा. वालीव वसई ह्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु आहे.

    Post Views:  483


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व