राजराजेश्वर नगरी मध्ये श्री संत वासुदेव महाराज पालखीचे जंगी स्वागत!


 संजय म. देशमुख  2023-06-06
   

अकोला :  श्री संत वासुदेव महाराज पालखीचे राजराजेश्वर नगरी अकोला मध्ये आगमन झाले असून जागोजागी भक्तगणांनी रांगोळ्या काढून तसेच वारकरी मंडळीचे उत्साहात स्वागत केले आहे. अनेक ठिकाणी चौका चौकामध्ये पालखीत सहभागी मंडळींना चहा, फराळ ,वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच पुष्पगुच्छ ,दुपट्टा ,नारळ देऊन स्वागत  करण्यात आले आहे. दिनांक 2 जून रोजी पालखीचे शहरात आगमन झाल्यानंतर
  संध्याकाळी 6 वाजता हिंदू धर्मशाळा रेल्वे स्टेशन अकोला राजू पुंडकर ,वामनराव पूडकर त्यांच्या निवासस्थानी येथे श्रींचे पूजन व आरती संपन्न झाली. भक्तांना चहा नाश्ता फराळ देण्यात आला. सायंकाळी कोल्हटकर मंगल कार्यालय अकोला येथे गोपाळराव दोड श्रींच्या पालखी सोहळ्याच्या पूजनानंतर, किर्तन व रात्रीच्या मुक्काम करण्यात आले. वारकऱ्यांना महाप्रसाद व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. दिनांक 3 जून ला सकाळी विठ्ठल भजनी मंडळ विठ्ठल मंदिर मोठी उमरी अकोला येथे प्रवचन व वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आला आहे. तर संध्याकाळी संतोष सावरकर श्री संत गजानन महाराज वाटिका मुकुंद नगर अकोला येथे रात्रीचे कीर्तन मुक्काम व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 दिनांक4/ जून 2023 ला सकाळी आठ वाजता श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठाचे विश्वस्त जयदीप सोनखास्कर यांच्या निवासस्थानी भक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना चहा नाश्ता भेटवस्तू  देण्यात आला. दुपारी वैकुंठ बाबुरावजी पवित्रकार द्वारका नगरी अकोला येथे सकाळचे प्रवचन व महाप्रसाद व स्वागत समारंभ पार पडला. संध्याकाळी सात वाजता श्री श्रीधरराव टीकार गुरुकुल नगरी हनुमान मंदिर मलकापूर खडकी अकोला येथे संध्याकाळचे कीर्तन व महाप्रसाद नियोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 जून ला श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले पाटील सिंधी कॅम्प अकोला पाटील दूध डेरी येथे पालखीचे भव्य दिव्य स्वागत  वासुदेव महल्ले पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले .त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर पालखी शहरातून मार्गस्थ करत संध्याकाळी प्रभास किड्स पातुर रोड वर पोचली ठीक ठिकाणी शहरांमध्ये पालखीचे भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .तर संध्याकाळी प्रभात किड्स परिवार च्या वतीने गजानन नारे यांच्यावतीने स्वागत समारंभ व  संध्याकाळी सात वाजता कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. राजराजेश्वर नगरी अकोला येथे चार दिवस मुक्कामचा शेवटचा दिवस आहेत. जागोजागी या पालखीचे स्वागत दुपारी प्रवचन व संध्याकाळी कीर्तन, भारुड, पावली, फुगडी आदी कार्यक्रम पार पडले आहे. श्री संत  वासुदेव महाराज यांच्या भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून पालखीच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेत आहेत. गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक तथाभक्त गणांनी हा पालखी सोहळा यशस्वी करण्याकरता सातत्याने परिश्रम घेत आहे.                       

Connection failed: Operation not permitted