कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी शिवराजे जामोदे यांचे गायन
अकोला : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथिल निवास स्थानी तेल्हारा जी. अकोला येथील शिवराजे जामोदे कविराज यांच्या अभंग गायनाचे सूर दुमदुमले.
नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते गेले असता त्यांनी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दि. 5 डिसेंबरला भेट दिली. विविध वृक्ष ललतीकांननी वेढलेल्या या सुंदर घरकुलात त्यांनी सुमधूर स्वरात. .
कुसुमाग्रज हे
साहित्याचे रवी
कविंचेहो कवी
एकमेव ...
ही अभंग रचना गायन केली. त्यांच्या नादमधुर स्वरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सप्त सूरांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान मधील रसिकांना सुद्धा मोहिनी घातली. शिरवाडकर आणि नाशिक नगरीवर लिहिलेला हा अभंग काळजाच्या तारा छेडून गेला.
शिरवाडकर हे
आठवे नक्षत्र
उज्वल चरित्र
गोदाकाठी. .
अश्या अप्रतिम ओळी वाहवा मिळवून गेल्या. शिवराज्यांच्या स्वरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. एका पेक्षा एक सरस, अर्थपुर्ण कल्पनांनी नटलेला अभंग कधिही भंग न पावनारा असाच आहे.
स्पर्शाने रामांच्या
भूमी ही पावन
लोक पुण्यवान
राहतात ...
असे यथार्थ वर्णन करणार्या या अभंगामुळे भक्ती, शक्ती, प्रतिभेचा सुगंध दरवळला. या प्रसंगी अकोला येथिल डाॅ. किरण वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. युवाकवी संदिप देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
Post Views: 278