दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे स्वर काव्य महोत्सवात दिव्यांगांना साहित्याचे वाटप व गुणगौरव सोहळा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
30 May 2023, 11:27 AM
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे 28 मे २०२३ रोजी आर एल टी विज्ञान महाविद्यालय अकोला येथे स्वर काव्य महोत्सवात दिव्यांगांना व्हीलचेअर , व्हाईट केन , ब्रेल बुक्स व शिष्यवृत्तीचे वाटप संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांच्या उपस्थितीत करण्यात आले . यावेळी मंचावर एडवोकेट मोती सिंग मोहता , प्राचार्य विजय नानोटी , ब्रिज मोहन चितलांगे , ओमकार गांगडे , योग तज्ञ भारती शेंडे , डॉ.सारिका शहा व प्रा.विशाल कोरडे उपस्थित होते . डॉ. हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाच्या प्रारंभी वैभवी गवई ह्या दिव्यांग विद्यार्थिनीने हीच आमची प्रार्थना हे गीत सादर केले . आपल्या प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष प्रा.कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला आंतरराष्ट्रीय मंचावर करत असलेल्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली . आजपर्यंत 7000 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेने सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले . संस्थेतर्फे या कार्यक्रमातून 25 दिव्यांगांना व्हीलचेअर , ब्रेल बुक्स , व्हाईट केन व शिष्यवृत्ती दिली जाणार असून प्रातिनिधिक स्वरूपात साक्षी धूरिया, वसुधा पंडित यांना व्हीलचेअर , रोहित सूर्यवंशी , सदानंद मुळे यांना व्हाईट केन तर मोहम्मद शोएब , मोहम्मद नाजील यांना ब्रेल बुक्स व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . आपल्या दिव्यांगत्वावर मात करून सर्पमित्र बाळ काळने , दिव्यांग कर्मचारी पोस्टल असिस्टंट दिलीप नालंदे व दिव्यांग स्वयंसेविका अंजली वानखडे यांचा सत्कार करण्यात आला . संगीतकार कौशल इनामदार यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्यत्व स्वीकारून या संस्थेसाठी मी संगीत क्षेत्रातूनही सहकार्य करणार असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतात अभिनेत्री इरावती लागू यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चित्रपट क्षेत्रातून दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या सामाजिक उपक्रमात सहकार्य मिळवण्यासाठी त्या प्रयत्नात असतील असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात एडवोकेट मोहता यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी तर्फे सहकार्य केले जाईल त्याचबरोबर ब्रेल पुस्तकांसाठी विशेष सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनामिका देशपांडे यांनी केले तर यशस्वी आयोजनासाठी प्रा मुकुंद पाध्ये ,हेमंतकुमार शाह ,शारदादेवी सत्यनारायण मंत्री, मंदा सदाशिव रुखणे,उत्कर्ष जैन, प्रशांत देशमुख ,जया देशमुख, मनोज कसूरकर ,संजय फोकमारे ,संजय जोशी, सूर्यकांत भरकर,शुभांगी मानकर व वंदना तेलंग यांनी सहकार्य केले .
Post Views: 240