एल. आर. टी. च्या एन. सी. सी. कॅडेटने मिळविले ४ सुवर्ण व ३ रौप्य पदक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Jun 2024, 3:25 PM
   

शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अकोला अंतर्गत दिनांक १५ जून ते २४ जून पर्यंत सी. ए. टी. सी. कॅम्प १०४ चे आयोजन करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वात या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
कॅम्पमध्ये एल. आर. टी. कॉलेज, शंकरलाल खंडेलवाल कॉलेज, शिवाजी कॉलेज, आर. एल. टी. कॉलेज, आर. डी. जी. कॉलेज, शिवाजी कॉलेज अकोट, पी. डी. के. वी. कॉलेज, माऊंट कारमेल शाळा, प्रभात किड्स शाळा,  होली क्रॉस हायस्कूल, बाक्लिवाल हायस्कूल वाशिम, स्कूल ऑफ स्कॉलर यांचे एकूण ४२२ एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. १० दिवस चाललेल्या या कॅम्पदरम्यान कॅडेट्सला नेतृत्व, अब्स्ट्रेकल, फायरिंग तसेच त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा व जबाबदाऱ्या कॅडेट्सला देण्यात आल्या. यामध्ये एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय येथील एन. सी. सी. च्या कॅडेटने कॅम्पच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन उत्तम प्रदर्शन करून ४ सुवर्ण व ३ रौप्य पदक प्राप्त केले. यामध्ये कॅडेट श्रध्दा पांडे हिला डिबेट कॉम्पिटिशनमध्ये सुवर्ण पदक, कॅडेट त्रिशब कोकाटे याला फ्लॅग एरियामध्ये सुवर्ण पदक, कॅडेट शुभम दुबे याला गार्ड ऑफ ऑनर मध्ये सुवर्ण पदक, कॅडेट प्रेरणा गोतमारे हिला क्विझ कॉम्पिटिशनमध्ये रौप्य पदक,  कॅडेट अविनाश वाकोडे याला ड्रॉइंग मध्ये रौप्य पदक, कॅडेट हर्ष देवगिकर याला डिबेट मध्ये रौप्य पदक कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांनी देऊन गौरविण्यात आले. तसेच कॅम्प सीनिअर म्हणुन उत्कृष्ट जवाबदारी सांभाळल्याबद्दल कॅडेट नितिक्षा पांडे हिचे अमरावती एन. सी. सी. ग्रुप कमांडर ब्रिगेडिर शांतनू मैनकर यांनी कौतुक करून तिला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची व एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर कॅडेटच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने, मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटरचे समन्वयक डॉ. वर्षा सुखदेवे, एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, एम. सी. एम. विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश चोटीया, चव्हाण होमिओपॅथीचे संचालक डॉ. संदीप चव्हाण व युवा अभंगकार श्री. प्रवीण हटकर यांनी कॅडेट्सनी मिळविलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. या कॅम्पमध्ये कॉर्पोरल आदित्य वाकोडे, कॅडेट यशवंत हरसूलकर, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट समर्थ दुबे, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट आयुष अंबरकर, कॅडेट रुपेश सांगोकार, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट नयन घुगे, कॅडेट शुभम दुबे, कॅडेट अविनाश वाकोडे, कॅडेट हर्ष देवगिकर, कॅडेट अजित वर्मा, कॅडेट यश कमलाकर, कॅडेट आयुष थोरात, कॅडेट अभिषेक बोराले, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट ओम बांगर, कॅडेट नितिक्षा पांडे, कॅडेट मोनिका ददगल, कॅडेट श्रद्धा पांडे, कॅडेट कोमल मेश्राम, कॅडेट प्रेरणा गोतमारे, कॅडेट भूमि काशिद, कॅडेट आर्या गंगाखेडकर, कॅडेट लिना काळे असे एकूण एकूण २६ एन. सी. सी. कॅडेटनी सहभाग नोंदविला होता. एन. सी. सी. कॅडेट्सनी मिळवलेल्या या यशाबद्दल बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, सहसचिव सी. ए. विक्रमजी गोलेच्छा व कार्यकारी सदस्यांनी कौतुक केले.

    Post Views:  91


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व