राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एल. आर. टी. च्या कॅडेट्सनी केले खिचडीचे वाटप
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
12 Jan 2023, 6:58 PM
दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला एन. सी. सी. विभागाद्वारे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बस स्टँड या परिसरात एन. सी. सी. कॅडेट्सतर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले. श्रीमती एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ.अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य चापके व कॅप्टन तिरकर यांनी या दिवसाचे महत्त्व कॅडेटला सांगितले. स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच १२ जानेवारी हा दिवस संपुर्ण भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील युवा पिढीला स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळालेले ज्ञान, प्रेरणा आणि तेजाचा फायदा आज होत आहे. त्यांना विश्वास होता की आजचा युवक "लोखंडाचे स्नायू" आणि "पोलादाच्या नसा" द्वारे सामाजिक बदल घडवून आणू शकतो. यापैकी एक म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एन.सी.सी.) ही जगातील सर्वात मोठी वर्दीधारी युवा संघटना आहे. जे देशातील युवांना शिस्तप्रिय आणि देशभक्त बनवीत आहे. युवा दिनाचे औचित्य साधून एन.सी.सी. कॅडेट्सनी बस स्टँड या परिसरातील स्लम एरिया मध्ये जाऊन सुमारे 100 लोकांना खिचडीचे वाटप केले. त्यांच्या या कार्यासाठी दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी एन.सी.सी विभागाचे कौतुक केले आणि कॅडेट च्या कार्याला शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रम यशस्वी बनवण्यासाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल शिवानी अवातिरक, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट अवंतिका खंडार, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट कल्याणी आमले, कॅडेट भुमी काशिद, कॅडेट नितिक्षा पांडे या कॅडेट्सचा सहभाग होता.
Post Views: 166