महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Feb 2026, 9:55 AM
   

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन अकोला येथे मा. सौ वैशाली नवघरे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली गटस्तरीय कार्यक्रम अंतर्गत दिनांक १९/०२/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री डॉ. मोहन खडसे  सुप्रसिद्ध लेखक तथा सेवानिवृत्त प्राध्यापक शिवाजी महाविद्यालय अकोला तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री सुधाकर गीते सदस्य महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक  मंडळ मुंबई मा. श्री रामराव पाटेखेडे ज्येष्ठ प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ अकोला व्याख्याते  सुप्रसिद्ध साहित्यिक मा. प्रा.श्री मोहन काळे तसेच मा.सौ.श्रद्धा ठाकरे प्रसिद्ध कथाकार अकोला हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविका सौ. वैशाली नवघरे प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला यांनी केले व्याख्याते सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. मोहन काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन व कौशल्य कसे होते.  याबद्दल अनेक उदाहरणे दिली. त्यांच्या  सामाजिक व राजकीय कार्याबद्दल  माहिती दिली तसेच मा. सौ.श्रद्धा ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आजच्या आधुनिक युगात बरीच तफावत आहे, ते 400 वर्षे पूर्वी चे  महाराजांच्या स्वराज्याचा धोरणाचे आजच्या पिढीने अनुकरण करणे गरजेचे आहे असे सांगितले. स्कंध नवघरे यांनी शिवाजी महाराजांवर सुंदर पोवाडा गायला. रामरावजी पाटेखेडे यांनी शिवाजी महाराजांवर सुंदर कविता सादर केली. अतिथी सुधाकरजी गीते यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन खडसे यांनी अध्यक्षीय भाषणात व्याख्यात्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे शेवटी राज्यगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रामटेके, केंद्र संचालक,  यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा पागधुने, कल्याण, निरिक्षक यांनी  केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री अतुल महल्ले, सहाय्यक संचालक,  मुकुंद देशमुख, सहा. संचालक श्री मनीष सरदार, नितीन मुळे , सौ.राणी चवरे , श्री सुरेंद्र शिरसाठ ,श्री सुनील रेठे, सौ अनिता रेठे , सौ.सविता सरफ, सौ.किरण भोगे,सौ. अर्पणा रंगारी, सौ.कविता कुकटकर ,सौ.विदया काळमेघ सौ. शोभा गड्डम ,सौ.शोभा यादव,  सौ. संध्या मेश्राम, सौ. बोबडे सुभाष लहाने सर्व सुरक्षा रक्षक इत्यादींनी परिश्रम घेतले.

    Post Views:  7


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व