बुलढाणा : काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेले, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतून केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सडकून टीका केली. इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना धमक्या दिल्या. मुंबईवरून दलाल पाठवले जायचे. त्यांच्यावरील आरोप वाचले जायचे. त्यांच्या आजूबाजूच्या दलालांना अटक केली. पण ताई हुशार. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना… तो फोटो छापून आणला. सीबीआय आणि ईडीची हिंमत आहे का मग अटक करायला. ही चालूगिरी आपल्याला समजत नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?
तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं. भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही.
संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे. काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातता. तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.
Post Views: 126
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay