१८ एप्रिल रोजी गुरुवर्य बलदेवराव पाटील (म्हैसने) यांचा अमृतोत्सव


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  17 Apr 2023, 6:14 PM
   

मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून आयुष्यभर  तन-मन धनाने  झटणाऱ्या व समाजाच्या कल्याणाकरिता निःस्वार्थपणे संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या तपस्वी, सेवाव्रती समाजभूषण  गुरुवर्य बलदेवराव पाटील (म्हैसने) यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा दि.१८ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी स्वराज्य भवन,(नवीन बस स्टँड समोर )अकोला येथे सकाळी ११.००वा. आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, तथा माजी मंत्री मा. जयंतराव पाटील हे भूषवणार आहेत.  मा. नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, यांचे शुभहस्ते व मा.  अरविंद सावंत, माजी केंद्रीय मंत्री, मा. संजय धोत्रे , माजी केंद्रीय मंत्री,मा.डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री, मा. प्रकाश महाराज वाघ, प्रचार प्रमुख अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ, मा. ,आचार्य हरिभाऊ वेरुळकर , आजीवन प्रचारक, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ,मा. गुलाबराव गावंडे, माजी मंत्री, मा.जनार्दनजी बोथे, सरचिटणीस,  अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ,ह.भ. प.ज्ञानेश्वर महाराज वाघ, मा. आमदार रणधीर सावरकर, मा. आमदार देशमुख नितीन, देशमुख, मा. आमदार गोवर्धन शर्मा, मा. सौ. संगीताताई अढाऊ, अध्यक्ष जि. प.अकोला ,मा. आमदार अमोल मिटकरी, मा. वसंत खंडेलवाल, सदस्य वि. प. मा.धीरज लिंगाडे ,सदस्य विधान परिषद मा. डॉ. रणजीत पाटील, माजी मंत्री, मा. भैय्यासाहेब तिडके, माजी आमदार, मा. नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, मा. डॉ. संतोषदादा कोरपे, अध्यक्ष, अ.जि. मध्यवर्ती बँक, मा. लक्ष्मणराव तायडे,माजी आमदार ,मा. दाळू गुरुजी, माजी आमदार, मा संजय गावंडे,माजी आमदार, मा.ॲड. नातीकोद्दीन खतीब, माजी आमदार मा. तुकाराम बिडकर,माजी आमदार, मा. बळीराम सिरस्कार, माजी आमदार, मा. बबनराव चौधरी, माजी आमदार, मा. हरिदास भदे माजी आमदार, मा. सत्यपाल महाराज, सप्तखंजिरी वादक, मा. गुलाबराव महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार, मा. ज्ञानेश्वर पाटील गणेश,अध्यक्ष, माऊली ग्रुप शेगाव, मा. अशोकराव अमानकर, अध्यक्ष,काँग्रेस कमिटी, मा. अशोकराव पटोकार, अध्यक्ष, मराठा सेवा संघ, मा. एकनाथ दुधे, उद्योजक, मा.शिरिष धोत्रे ,सभापती, कृ.उ. बा. समिती, मा. डॉ.दीपक मोरे, ज्येष्ठ धन्वंतरी यांचे प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे...
या सोहळ्याकरिता अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्याl व्यायामपटू व बलदेवराव पाटील यांचे अनुयायी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या या सोहळ्याकरिता नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल अ.भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, श्री. गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळ व आयोजन समितीचे अध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे व आयोजन समिती उपाध्यक्ष, डॉ.संतोष हुसे, सचिव,अतुल अमानकर, तसेच सदस्य महादेवराव वानखडे, शेख रऊफ  गुरुजी वसंतराव माळी, श्रीकृष्ण बिलेवार, विपुल म्हैसने यांनी केले आहे.

    Post Views:  129


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

आई

४२ मिनेट