दबंग पोलीस अधिकारी विलास पाटील यांची शेगावात एंट्री
स्वप्निल देशमुख
2023-06-07
- आता गुन्हेगारांची खैर नाही*
- अकोला व चिखली गाजवणारे विलास पाटील आता शेगाव ठाणेदार
- शेगावात पोलीस दलात एका दबंग अधिकाऱ्याची एन्ट्री
शेगाव:- ( जि.प्र स्वप्निल देशमुख)
बुलढाणा जिल्ह्यात शेगाव मध्ये गुन्हेगारी चांगलीच बोकाळलेली आहे.
सावकारी ,.दिवसाढवळ्या खून,दरोडे,मारामारी हप्तेवसुली,अवैध व्यवसाय, कामांवरुन, जमीन खरेदी विक्रीवरुन या भागात नेहमी वाद होत असतात. भाई-दादांची संख्या या भागांमध्ये झपाट्याने वाढली आहे.
या अधिकाऱ्याच्या बदलीमुळे या भागातील भाई-दादांची पुरती वाट लागणार असल्याचं बोललं जातंय.
शेगाव ठाणेदार विलास पाटील हे कडक शिस्तीचे खमके अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत.अनेक किचकट गुन्ह्यांचा तपास लिलया करणारे अधिकारी म्हणून नावलौकिक असणारे विलास पाटील कायदा सुव्यवस्था राबविण्यात अतिशय कर्तव्यनिष्ठ असल्याची खात्री पोलीस दलात आहे.त्यांनी विविध पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य केलेले अकोल्यात दिर्घ काळ ते राहिलेले आहेत.
नामचीन गुंडांना वठणीवर आणण्यात हातखंडा असणारा अधिकारी म्हणून ते आपल्या कामामुळे पोलीस दलात परिचित आहेत.आपल्या कार्यकाळात अनेक गुंडांना गजाआड पाठवणारे अधिकारी विलास पाटील शेगाव ठाणेदार लाभले असल्याने बऱ्याच अंशी गुन्हेगारीवर अंकुश बसणार आहे.
Post Views: 185