खोटारडा धिरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आल्यास त्याचे तोंड काळे करू : गजानन हरणे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Feb 2023, 8:42 AM
   

अकोला - जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विषयी लायकी नसताना बेताल वक्तव्य करणाऱ्या स्वयंघोषित खोटारडा कुत्रा धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज याने महाराष्ट्रात येऊन एक कार्यक्रम घेऊन दाखवावे. त्याला त्याची जागा दाखवून त्याचे तोंड  काळे केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी दिला आहे. तसेच त्याच्या अडाणी बकवास वक्तव्यामुळे आमच्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे या भामट्याच्या विरोधात त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी निर्भय बनो  जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.  ज्या जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर भोंदूगिरी व कर्मकांड यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले अश्या विज्ञानवादी संतावर  अश्या भोंदूगिरी भामट्या बदमाशबाबा ने उपहासात्मक टीका करून इतिहासाची मोडतोड करून जनतेची  दिशाभूल करणाऱ्या पाखंडी भोंदू बाबा वर सरकारने बंदी घालून त्यांचे लोकांना फसवणारे दरबार आदि कृत्याबाबत यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया चालू करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारल्या जाण्याचा इशारा समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.अकोला जिल्ह्यात अनेक संघटनांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दिलेली आहेत. त्यावर सुद्धा कारवाई करण्याची  मागणी निर्भय बनो जन आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

    Post Views:  283


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व