व्यंगचित्रांच्या माध्यमातून विज्ञान कार्यशाळेचे आयोजन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Feb 2024, 8:33 AM
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यंगचित्रकला संग्रहालयातर्फे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशाले मध्ये विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार विजेत्या डॉ. हेमाली जोशी यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना मुलांना शिकवल्या. व्यंगचित्रांचा वापर करून शैक्षणिक अनुभवाला एक सर्जनशील आणि दृष्यात्मक घटकाची जोड दिली व संकल्पना अतिशय मजेदार आणि आकर्षक पद्धतीने सादर केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे झाले. याच उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी केले.
याप्रसंगी प्रसिद्ध व्यंगचित्रकार सूरज एस.के. श्रीराम, प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, गौरी गोळे ,तेजस्विनी निरगुडे,पल्लवी अभंग,रेश्मा पुरी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे व्यंगचित्रांचा अनुभव घेतला व ती रेखाटली. ब्रिटिश कालीन इतिहास विषयाशी निगडित व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आले होते.
Post Views: 889