अहमदाबाद येथील राष्ट्रीय नृत्यारंभ स्पर्धेमध्ये अनोखी व चहेती चांडक तृतीय क्रमांकाच्या विजेत्या.
संग्रामपूर ---अखिल नटराज अंतर सांस्कृतिक संघ (मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सी आय डी पॅरिस-फ्रान्स) यांच्या अंतर्गत ऑल इंडिया 9 th कल्चरल नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिवल 22 मे ते 25 मे 2023 पर्यंत अहमदाबाद, गुजरात येथे घेण्यात आली. ह्या राष्ट्रीय स्पर्धेत भरतनाट्यम, कथ्थक, हिप हॉप, सेमी क्लासिकल, इत्यादी अनेक नृत्यांचा समावेश होता. ह्या कॉम्पिटिशन मध्ये सोलो परफॉर्मन्स मध्ये कु.अनोखी नारायण चांडक हिने तसेच कु. चहेती नारायण चांडक हिने तृतीय क्रमांक पटकविला. दोघींनाही मेडल, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दोघीही गुरु बालचंद्र चिन्हारा केरला यांच्याकडून मागील पाच वर्षापासून धुळे येथे प्रशिक्षण घेत आहेत. कु. अनोखी व कु. चेहेती ह्या श्री. रतनलालजी सु. चांडक वानखेड यांच्या नाती आहेत. दोघींचेही वानखेडे परिसरातून व ठीकठीकाणहून अभिनंदन होत आहे.
Post Views: 271