बोईसर ग्रामपंचायतिने बांधकाम वर हरकत घेऊन काढली नोटीस


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Apr 2023, 8:50 AM
   

बोईसर - (संतोष घरत) मौजे बोईसर येथील एका जागेवर कायदेशीर विकासकाचा ताबा असून त्याची कोट्यवधींची जमीन हडपण्यासाठी व वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वाद उपस्थित केला आहे. याठिकाणी विकासकाकडून मोठी रक्कम हडपण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्र. १११ - अ/१/१,१११- अ/१/२, १२१,१११/अ/२,१११ /३/२ आणि ११२/१ जमिनीवर यु.के. बिल्डर्स यांनी ओस्तवाल एंपायर, हा गृहप्रकल्प उभारला आहे. या गृहप्रकल्पातील बिग बाजार च्या मागील बाजूस असलेल्या जमिनीवर विकासकाने क्लब हाऊसचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र या बांधकामाला बोईसर ग्रामपंचायतीने हरकत घेतली असून ही जागा विक जलजीवन मिशन अंतर्गत गारगाव- खानीवडे व २२ गावे प्रादेशिक ग्रामीण सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे व या ठिकाणी जलकुंभ बांधण्यात येणार असल्याची नोटीस विकासक यु.के. बिल्डर्स यांना बजावण्यात आली आहे. तसेच या जमिनीवर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसीत म्हटले आहे.
ओस्तवाल एंपायरचे विकासक यु.के. बिल्डर्सने मात्र या ठिकाणी सुरू असलेले क्लब हाऊसचे बांधकाम, हे मंजूर आराखड्यानुसार करण्यात येत असून सार्वजनिक कामासाठी असलेल्या कुठल्याही राखीव जमिनीवर बांधकाम सुरू नसल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे बोईसर ग्रामपंचायतीने विकासकाच्या खाजगी जागेवर लावलेला नोटीस फलक त्वरीत काढून टाकावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विकासक यु.के. बिल्डर्स यांच्या वकीलांनी दिला आहे. बोईसर ग्रामपंचायत ही सदैव कुठल्या ना कुठल्या वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. नुकताच बेकायदेशीररित्या बाजारकर ठेका, हा यां विषय चर्चेत असताना हे आणखी एक प्रकरण बाहेर आले आहे. मोठ्या रकमेच्या हव्यासापोटी विकासकांकडून तेथे सुरू असलेल्या  क्लब हाऊसच्या कामाला विरोध  करण्यात येत असल्याचा दावा विकासकाने केला आहे.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक सरकारी जमिनी या भूमाफीयांनी बळकावल्या असून त्यावर अनधिकृत इमारती आणि चाळींचे बांधकाम केले आहे. ऐकीकडे ग्रामपंचायतीकडे शाळा, अंगणवाडी, रुग्णालय, समाज मंदीर, पाणी पुरवठा योजना यांसारख्या सार्वजनिक सुविधां निर्माण करण्यासाठी मोकळ्या जागा उरल्या नसताना दुसरीकडे मात्र अनधिकृत बांधकाम करणार्यांना बिनदिक्कत ना हरकत दाखले, घरपट्टया आणि नळ जोडणी ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारी मोकळ्या जमिनी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीला संघर्ष करावा लागत आहे.

    Post Views:  198


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व