उमरीतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात भागवत सप्ताह
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Jan 2026, 9:11 AM
मंदिर वर्धापन दिन सप्ताहात विविध कार्यक्रम
अकोला - स्थानिक मोठ्या उमरीतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्य कुणबी समाज बहुजन मंडळ, अकोला यांचे वतीने श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ ते २ फेब्रुवारी २०२६ चे दरम्यान आयोजन केले आहे. .
या सप्ताहात ह.भ.प. श्री विठ्ठल महाराज धोतर्डीकर, अकोला यांचे अमृततुल्य वाणीतून भागवताचे दररोज दुपारी १ ते ५ पर्यंत आयोजन केले आहे. तसेच दररोज रात्री ८ ते १० हरिकिर्तन, सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सौ. सुमनताई बदरखे रा. सस्ती, मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ रोजी विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. श्री जलाल महाराज सैय्यद (करंजीकर), ता. निफाड, बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. श्री गोपाल महाराज देवर, डोंगरगाव, गुरुवार दि. २९ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. डॉ. प्रा. प्रशांत महाराज ठाकरे, शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. श्री मंगेश महाराज वर्हाळे, रा. दाताळा, शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज तर्हाळे, रा. व्याळा, रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ह.भ.प. श्री राजेंद्र महाराज वक्टे, रा. पाळोदी, यांची किर्तने आयोजित करण्यात आली आहेत. सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर यांचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा, दुपारी १ ते ५ भागवत, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकिर्तन होईल. वरील सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविका भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती कुणबी समाज मंडळ व तुकाराम महाराज मंदिर, मोठी उमरी, अकोलाचे अध्यक्ष श्री गजाननराव थोरात, उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव माहोकार, कोषाध्यक्ष श्री आत्मारामजी शेळके यांनी केले आहे.
Connection failed: Operation not permitted