भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध


पोलिस तपासात बंद खोलीचे गूढ उघड
 संजय देशमुख  29 Jan 2022, 8:37 PM
   

इंदूर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली असली तरी या प्रकरणातील महाराजांच्या बंद खोलीचे गूढ आता उकलले असून, पोलिसांच्या लेखी भय्यू महाराजांचे पलकसह इतर 12 तरुणींसोबतही संबंध होेते. त्यातील दोन तर आयएस अधिकारी होत्या असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात प्राथमिक तपासात हे सर्वसाधारण प्रकरण असल्याचे वाटत होते. तेव्हा फर्स्ट इन्वेस्टिगेशन ऑफिसर असलेले सीएसपी मनोज रत्नाकर यांनी घरगुती विवादातून आत्महत्या केल्याचा रिपोर्ट सादर केला होता. फाइल बंद करण्याची तयारीही सुरू झाली होती.
दोन महिन्यांनंतर महाराजांच्या जवळचे वकील निवेज बडजात्या यांना 5 कोटींच्या खंडणीचा कॉल आला. हा धमकीचा कॉल एकेकाळी महाराजांचा ड्रायव्हर असलेल्या कैलाश पाटील याने केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी महाराजांची सेवा करणारा विनायक, शरद आणि शिष्या पलक यांच्यातील संबंधाचा खुलासा झाला. त्यानेही हे मान्य केले की, अनेकदा महाराजांच्या गाडीतून पलक हिला घरातून आश्रमात आणण्याचे काम केले आहे.
गाडीमध्ये ती जे काही विनायक आणि शरदशी बोलत होती, ते त्याच्या लक्षात आहे. याच्या आधारावर पोलिसांनी तीन आरोपी शरद, विनायक आणि पलक यांचा जबाब नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी जबरदस्ती करीत होते. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आले की, महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध होते, यातील 2 तर आयएएस आहे. मध्य प्रदेशातील एका मोठ्या दैनिकाने याबाबतचे वृत्त आधीच प्रकाशित केले आहे.
भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोन महिन्यांपर्यंत पोलिसांनी काहीच सुगावा लागत नव्हता. तत्कालीन डीआयजी हरिनारायण चारी मिश्र (आता इंदूर पोलिस कमिश्नर) यांचे या प्रकरणात लक्ष ठेवण्यास सांगितले होते. महाराजांची फाइल बंद करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसानेच महाराजांच्या आत्महत्येच्या सहा महिन्यानंतर विनायक, पलक आणि शरद यांनी अटक केली.
एका फोन कॉलमुळे झाला खुलासा..
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातील 20 हून अधिक लोकांचा जबाब घेतला होता. कुटुंबातील काही सदस्यांनीही जबाब दिला. यादरम्यान भय्यू महाराज यांच्या जवळचे असलेले आणि गेल्या 22 वर्षांपासून त्यांच्या सोबत असलेले वकील निवेश बडजात्या यांना एक अज्ञात फोन आला आणि त्यांनी 5 कोटींची मागणी केल्यानंतर तपासाला दिशा मिळाली.

    Post Views:  304


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व