अकोला - अकोला शहरातील वाहतूक समस्या ही निर्माण झालेली नाही तर निर्माण केलेली समस्या आहे.अस्थाव्यस्था वाहतुक आणि ऑटो चालकांची अनागोदी आणि मनमानी हे वाहतूक समस्येचे मूळ कारण आहे.दुचाकी व इतर वाहन चालकाना कायदयावर बोट ठेऊन आणि काायद्याचा धाक दाखवुन अतिशय क्षुल्लक कारणा वरून दंड आकारण्यात येतो, परंतु या विरुद्ध शहरात ग्रामीण परवाना असलेल्या ऑटो रिक्षांचा प्रवेश , अनोंदणीकृत आणि विना परवाना ऑटो रिक्षांचा शहरात वावर ,वाहन चालका जवळ ना परवाना ऑटो, ना बॅच,ना बिल्ला ,ना ड्रेस, या ही उपर झालेली परिसीमा म्हणजे शहरात खुले आम फिरणाऱ्या अर्ध्या पेक्षा जास्त ऑटो रिक्षांवर नंबरच नाहीत.वास्तविक सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चार नंबर असणे आवश्यक असते.परंतु शहरात फिरणाऱ्या अनेक ऑटो रिक्षांवर एकही नंबर नाही. एकादी दुर्घटना किंवा अपघात झाल्यास नेमकी कोणाची कोणाची आणि कोणत्या वाहनाची तक्रार करायची ? याचा पोलिस विभागां कडून खुलासा होणे गरजेचे आहे.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रात व त्यातही जळगाव , अमरावती ,नागपूर , यवतमाळ, नाशिक ,या शहरातील सर्व ऑटो रिक्षां चालकाना युनिफॉर्म सह बॅच बिल्ला जवळ बाळगणे बंधन कारक असताना या बाबींची व या नियमाच्या अंमल बजावणीची गरज पोलिस विभागाला का वाटत आहे. फक्त अकोला शहरात हा नियम कोणत्या कायद्याने शिथिल करण्यात आला आहे. याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
नवीन नवीन आल्यावर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी प्रथम दर्शनी वाहतुक नियंत्रण करण्याच्या नावाखाली काही ऑटो रिक्षां चालकावर tharur मातुर कार्यवाही केल्याचे भासवले, परंतु गेल्या काही दिवसात ऑटो चालकाची दादागिरी, बेजबबदार पणाने वागून होणारा वाहतूक अडथळा , अनागोंदीपणा पुर्व पदावर आलेला आहे.
या मुळे नागरिकांना एक प्रश्न पडला आहे की वाहतुकीचे सर्व नियम फक्त दुचाकी चालकांनाच लागू आहेत का ?
पोलीस प्रशासनाच्या या सपत्नीक वागणुकीमुळे पोलीस प्रशासन ऑटोरिक्षा युनियन च्या दबावाखाली काम करते काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Post Views: 95