महात्मा गांधी प्रार्थना स्थळाजवळ; प्राध्यापक बालाजी कोम्पल वार नांदेड; यांचे अध्यक्षते खाली व संयोजक; भाई रजनीकांत यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये होऊन; इंग्रज ज्याप्रमाणे भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणारी धोरणे होती; त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड लूट व्हायची आणि आज इंग्रजापेक्षाही भारताचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांची लूट करणारे नव्हे तर त्यांना मृत्यूच्या सापळ्यात लोटणारी जुलमी आहे. सर्व धोरणे ही भारतातील लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास बाध्य केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात; महाराष्ट्रासह भारतामध्ये 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे स्वातंत्र्य कुणाला व कुणासाठी अशी राज्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आली आहे; त्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी कार्यकर्त्यांनी शेतकरी सनद तयार करून; अमृत महोत्सवी वर्षात दिल्लीच्या व महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना जबाब विचार ण्याचा निर्णय व आजचे सभेत संकल्प केला आहे. भारतातील अन्नदात्यांना एका बाजूला निसर्ग संकटाला तोंड द्यावे लागत आहे व दुसऱ्या बाजूला सरकारचे व्यापारी व उद्योगपतींना शोषण करु देणारे धोरण; शेतकऱ्यांना सन्मानाने जगणे अशक्यप्राय केले. त्यामुळे देशातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहेत. अशी स्थिती इंग्रजांच्या कालखंडातही नव्हती त्यांच्या कालखंडात भारतामध्ये अनेक दुष्काळ पडलेत;त्यामध्ये लाखो लोकांना अन्नाशिवाय व गुरांना पाणी; चाऱ्या वाचून मरावे लागले. परंतु तेव्हा कोणीही आत्महत्या केल्याचे इतिहासामध्ये नमूद नाही. परंतु भारतीय दिल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडा मध्ये आज लाखो शेतकऱ्यांना आपल्या नीतीमुळे जिवंत मारण्यात आले आहे;स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याचे व दिल्लीच्या राज्यकर्त्यांना जाहीर जबाब विचारण्याचा निर्धार आज शेतकऱ्यांनी केला आहे. त्याकरिता शेतकरी जागरण अभियान ;यवतमाळचे शेतकरी साहेबराव करपे यांनी सन्मानाने जगणे असह्य झाले म्हणून आपली पत्नी व 4 मुलांची सामुहिक आत्महत्या 19 मार्च ला;35 वर्षापूर्वी वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर ला येउन केली;त्या स्मृतिदिना पासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रचार अभियानात स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणा स्थळ गांधीजी व देशातील हजारो स्वातंत्र्यवीराचे पदस्पर्शाने;देशातील अन्यायग्रस्ताना आर्थिक न्याय मिळावा ही भारताचे भूमिका मांडणारे घटनाकार डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्थळाची पावन झालेली माती मस्तकी टिळा लावण्या साठी व शेतकय्रांना हक्काची लढ्याची प्रेरणा मिळावी ती नेण्यात व गावोगावी वितरीत करण्यात येईल. शेतकरी सनद मागणीपत्र-- 1) शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल दोषी असणारे महाराष्ट्र व केंद्र सरकारने जाहीर माफी मागावी; व तसे प्रस्ताव सभागृहात करावेत; व प्रायचित्त घेण्याचा निर्णय घ्यावा;2) शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसास महाराष्ट्र सरकारने दहा लाख रुपये व केंद्र सरकारने एक कोटी रुपये द्यावेत; शेतकऱी विधवेला; वारसाला नोकरी अग्रक्रमाने द्यावी;व मुलांचे शिक्षण व प्रशिक्षण करावे;3) शेतकऱ्यावरील सर्व राष्ट्रीयकृत; सहकारी बँकांचे; सावकारी कर्ज रद्द करण्यात यावे; ट्रॅक्टर शेती विषयक अवजारे व अन्य कोणतेही कर्ज; थकबाकी असल्यास ती रद्द करण्यात यावी. शेतकऱ्यांना शेती करण्याकरता आवश्यक भाग भांडवल सरकारने पुरवावे. 4)शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे मोल किमान तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याएवढे दरमहा सातव्या वेतन आयोगाच्या आधारावर मिळावे;5)वृद्धापकाळा मध्ये त्याच आधारावर निवृत्ती वेतन मिळावे. 6) शेतीच्या बाजार मूल्यावर आधारित दरमहा शेतीचे भाडे मिळावे.7) शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर ठरवून; तो भाव व शेतमाल खरेदी करण्याचा कायदा केला जावा. 8) नैसर्गिक आपत्ती तसेच वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसानीचा विमा 100% मिळण्याचा कायदा करण्यात यावा.9) शेतीला दिवसा वीज व पाणी मिळण्याची तरतूद व्हावी.10)शेतमाल प्रक्रिया उद्योग उत्पादन क्षेत्रामध्येच काढण्यात यावेत. आजच्या सभेला वसंतराव चांभारे; दिनेश गणविर; सागरराव कोल्हे;ज्ञानेश्वर ढगे;जिल्हा वर्धा; श्री यशवंत फडतरे; सोलापूर;डॉ.माऩधने; महादेवराव सावके;अविनाश प्रसारकर; शिवाजीराव पसारकर ;वाशिम;माधव बावगे;अॅड.शिवाजीराव पाटील;राम चौधरी;लातूर; सौ.लताताई राजपूत;समा धानजी गावंडे;बुलढाणा;श्री. केशवराव काठोळे;महेश आढे; प्रल्हादराव नेमाडे;रवी नेमाडे ;अकोला; अभिमन्यू भारतीय;डॉ.सुधाकरराव वाढोणकर;अमरावती; रवी गावंडे; विनोद देवतळे; डाॅ.राजभोज;तरोने; गोंदिया; जसवंत बारई; वनवे;भंडारा.प्रा.बंडू शिंदे नागपूर हे उपस्थित होते.
Post Views: 208
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay