माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन सोहळा
गुरुवार दि.२७ ऑक्टोबर २०२२
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Aug 2022, 8:53 AM
हुतात्मा स्मारक समिती आष्टी द्वारा संचालित हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी जि. वर्धा येथील सन १९६० ते २०१५ पर्यंतच्या कालावधीत इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या समस्त माजी विद्यार्थ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचारीवृंदांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे तहकूब करण्यात आलेल्या भव्य माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ रोजी हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी येथील भव्य प्रांगणात करण्यात आलेले आहे. करिता वरील कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंद करुन घेण्यासाठी खालील शिक्षकांच्या क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती.
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत
नोंदणीसाठी क्रमांक
१) श्री. आर. पी. बालपांडे (9921778824)
२) श्री. व्ही. ए. बुरघाटे (9923819849)
३) श्री. व्ही. डब्ल्यू. कडू (9404202744)
४) श्री. एस. आर. सव्वालाखे (98609 23727)
आयोजक : हुतात्मा स्मारक समिती,आष्टी
ता.आष्टी जि.वर्धा
Post Views: 172