अन्न व औषध प्रशासनाकडून लोणार येथे धाड


२४ ला ३३ हजारांचा अवैध औषधसाठा जप्त; या धडक कारवाईत कामोत्तेजक गोळ्या पण जप्त
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Dec 2024, 8:19 AM
   

अकोला / वाशिम - सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन म.राज्य, बुलढाणा कार्यालयातील औषध निरीक्षक, श्री. गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्या आधारे श्री. एम.व्ही. गोतमारे, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन विभाग,  वाशिम यांच्या समवेत त्यांनी दिनांक १९ डिसेंबर रोजी मौजे लोणार येथे धाड टाकली या धडक कारवाईत स्थानिक बसस्टॅंडजवळील चंदन मेडीकोजचे मागील क्रं.०१ घ्या खोलीतून एकून २४ लाख ३३ हजारांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.  तपास व चौकशीअंती  सदर जागेत विनापरवाना. औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले. श्री. सुशिल पुनमचंद दरोगा या हजर व्यक्तीकडून  नमूना  १६ व पंचनामा अंतर्गत एकूण २४.३३ लक्ष चा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. सदर साठयातून. औषध नमूना विश्लेेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. चंदन मेडीकल स्टोअर्स, येथून कामोत्तेजक औषधी ( Vigox-१००) आढळून आल्याने हा रुपये ८२२५/- चा साठा नमूना १५ दिनांक १९ डिसेंबर  रोजी प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
       जिल्ह्यातील सर्व मेडीकलधारकांना कळविण्यात येते की, झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व अ‍ॅलोपॅथीक औषधे त्यांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत, तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे.या बाबींचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या अंतर्गत नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच बुलढाणा जिल्हयातील सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कुठलीही. अलोपॅथीक औषधे विना प्रिस्कीपशन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. स्वत:च्या मनाने औषधे घेतल्याने शरीरावर दुष्परीणाम होतात असे सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, बुलढाणाचे श्री. गजानन प्रल्हाद घिरके यांनी सूचीत केले आहे.

    Post Views:  14


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व