बाल तस्करी विरुद्ध जनजागृती अभियान


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  31 Jul 2023, 7:51 PM
   

अकोला : जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जून रोजी  कांचनपूर येथे कैलास सत्यार्थी   चिलदरेन्स फौंडेशन नवी दिल्ली व सेवाधर्म शिक्षण व  बहुउद्धेशिय संस्था, अकोला चे संयुक्त विद्यमाने  बाल तस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम राबविली.यावेळी शपथही देण्यात आली.

सेवाधर्म संस्था  अकोला  व वाशीम  जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, पंचायतीमध्ये घरोघरी जाऊन बाल तस्करी आणि बालमजुरीविरुद्ध जनजागृती मोहीम राबवत आहे आणि ग्रामस्थांना  बाल तस्करी थांबवण्याची शपथ देत  आहे. बाल तस्करी आणि बालमजुरी विरुद्ध लोकांमध्ये जागरूकता पातळी वाढवणे आणि त्यांच्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणे हे या निरंतर प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. गेल्या दशकात देशातील केंद्र आणि राज्य सरकारांनी बाल तस्करीवर मात करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली  जात आहेत. 
देशाच्या विविध भागांमध्ये अनेक दशकांपासून बाल शोषण किंवा मुलांची तस्करी रोखणे हे एक मोठे आव्हान आपल्या सर्वां समोर आहे. शासकीय  आणि निम शासकीय  स्तरावरील प्रयत्नांमुळे तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद वाढली असली तरी अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे  आहे.
देशात लहान मुलांच्या तस्करीच्या वाढत्या  प्रकाराबाबत घटनांबद्दल तुषार हांडे यांनी माहिती देऊन , देशभरात बाल तस्करीची व्यापकता विशद केली आहे . आम्ही तळागाळात सुरू केलेल्या घरोघरी जाऊन जनजागृती मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, समाजात एक हा मोठा बदल घडून येत  आहे.
या वेळी प्रामुख्याने तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मोतिरामजी शिरसाट , यशवंत चोरे , रामेश्वर शेळके , एकनाथ पाटील चोरे , बाळ वारकरी संप्रदायक अध्यक्ष  जगदीश महाराज चोरे , सुधाकर शेळके , निरंजन सिरसाट, हिम्मतराव शेळके,प्रदीप चोरे, प्रल्हादभाऊ चोरे , पांडुरंग शेळके , कैलास अवतिरक, संतोष गव्हाळ , डॉक . चोरे, 
आनंद चोरे , स्वेत चोरे , हरिओम चोरे, आनंद गावंडे , प्रथमेश चोरे यांची उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपसरपंच शिवशंकरभाऊ  वासुदेव  पाटील यांनी केले आहे . 

    Post Views:  160


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व