Brking News : कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?


 Sanjay M. Deshmukh  2021-11-21
   

नवी दिल्ली : जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर तीन टक्क्यांनी घसरून 78.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने जगतीक स्थरावर कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणेज तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने येणाऱ्या काळात भारतामध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. मात्र आज कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांची घट होऊन देखील भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय 

गेल्या चार नोव्हेंबरला केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले होते. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. केंद्रनंतर अनेक राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाले आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

    Post Views:  286


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व