समर्पित निष्काम कर्मयोगी कार्याची समाजाला गरज : जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Feb 2023, 3:17 PM
आळंदी चाऱ्होली पुणे : राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल हे फक्त लेवा पाटीदार समाजासाठीच नव्हें तर सर्व राष्ट्रभक्तासाठी, सर्व समाजासाठी आदर्श स्फूर्तीस्थान आहे. समाजाचे पूनरुस्थापण, उन्नयन , उस्थापन करण्यासाठीं निरंतर निरपेक्षपणे कर्म, विकर्म, अकर्म सोडून निष्काम कर्मयोगी कार्ये केल्यास प्रगल्भ समाज निर्माण होइल. ह्यासाठी समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्ये अत्यंत आवश्यक आहे . समर्पित निष्काम कर्मयोगी कार्याची समाजाला गरज आहे ,असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले. पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ व लेवा संघीनी मंच च्या संयुक्त विद्यमाने स्नेह संमेलन मेळावा, विविध गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम मुक्ताई लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रविंद्र भोळे पुढे म्हणाले की कोणत्याही सामाजिक धार्मिक कार्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान महत्वाचे असते. माउली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीने पवित्र झालेल्या ह्या पावन भुमित निरंतर, नव चैतन्य प्राप्त होत असते. ह्यातून सलोकता समिपता, साजूकता, स्वरूपता ह्या मुक्तीसाठी व मनुष्याला जिवन जगण्यासाठीचे गुह्यगुपित ज्ञान प्राप्त होते . अश्या विचारातून स्नेसंमेलन , स्नेहमेळावा ह्यासारखे उपक्रम राबवित असताना सात्विक विचारांची देवाण घेवाण होऊन सूख दुःख हलके होते विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मार्गदर्षणामुळे नवनिर्मितीचा ध्यास होउन महत्वाकांक्षा वाढीस लागते, त्यामुळे सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी असे उपक्रम लेवा पाटीदार संघ राबविते हे कैतुकास्पद आहे . कार्यक्रमांचे अध्यक्ष लीलाधर वराडे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की आपली माणसे सूख दुःख असताना भेटली तरच समाधान मिळते ह्यासाठी सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमांना उपस्थत राहणे गरजेचे आहे. ह्या प्रसंगी लेवा पाटीदार संघाचे अध्यक्ष निनाजी खर्चे, ह्यांनी संस्थेच्या कार्याची माहीती दिली. ह्या वेळीं सौ किरण पाचपांडे ह्यांना प्रमुख पाहुणे डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न पुरस्कार देउन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डॉ ज्ञानेश्र्वर पाटील, डॉ मिलींद चौधरी, अमोल पाटील अध्यक्ष लेवा मंच, मुक्ताई मंदिर ट्रस्ट, दिपक पाटील, डॉ प्रफुल्ल पाचपांडे, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, पदाधिकारी, समाज बांधव भगिनी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 334