अतिवेगाने चालणा-या वाहनांवर करणार कारवाई आरटीओच्या तपासणी यंत्रणेत अत्याधुनिक वाहनांची भर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 May 2024, 2:25 PM
   

अकोला  : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी यंत्रणेत 3 इंटरसेप्टर वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सदोष वाहन तपासणी, तसेच अतिवेगाने चालणा-या व नियमभंग करणा-या वाहनधारकांवर कारवाईला वेग येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली. तपासणी ताफ्यात 3 वाहनांची भर पडल्याने आता एकूण 4 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यात स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, टायर ट्रेंड ग्रेज ही उपकरणे उपलब्ध आहेत. स्पीड गनद्वारे अतिवेगातील वाहनांवर, तसेच ब्रेथ ॲनालायझरच्या तपासणीद्वारे दारु पिऊन वाहन चालविणा-यांवर कारवाई करण्यात येईल. या वाहनांतील लेझर कॅमे-याद्वारे तपासणीतून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती दुतोंडे यांनी सांगितले. 
वाहनांतील उपकरणे अद्ययावत व तंत्रदृष्ट्या अधिक प्रभावी आहेत. त्यामुळे वाहतुकीत दोषी आढळणा-या वाहनांची तत्काळ नोंद होऊन वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जाईल. अपघात टाळण्यासाठी व आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    Post Views:  74


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व