अकोला पूर्व चे आमदार साहेब रणधीरजी सावरकर यांनी बाळापूर विधानसभा मतदार संघातील ४५ दिवसापासुन विद्युत वितरण कंपनी आणि शेतकरी यांचा चालू असलेला संघर्ष मिटवला
मौजे व्याळा - येथील शेतकरी गेले ४५ दिवसापासुन विद्युत कंपनी चे अधिकारी यांनी ऐका महिन्यात बंद सात ट्रान्सफार्मर शेतकर्याच्या माथी मारून शेतकर्यांना बदनाम करण्याचे काम अधिकारी करत होते. अखेर शेतकर्यांनी ४५ दिवसानंतर सर्व हकिकत आज ४ वाजता आमदार साहेब रणधीरजी सावरकर यांना संपर्क करून प्रकरणाची संपुर्ण माहीती दिली. आमदार साहेब बाहेर गावी होते तरी त्यांनी शब्द दिला कि ऐका तासात मी पोहचतो. आणि ते ५:३० मी. विषेश कार्यकारी अधिकारी श्री. कासट साहेब यांच्या दालणात हजर झाले आणि यशवंतराव देशमुख यांना फोन करून बोलावुन घेतले. यशवंतराव देशमुख यांनी अधिकारी आणि आमदार साहेब यांच्या समोर सर्व मुद्दे मांडून घटना सांगीतली. आमदार साहेबांनी अधिकार्यांना धारेवर धरले आणि स्वताहा निधी देऊन शेतकर्याच्या अडचणी सोडविण्याचा आदेश दिला. आमदार साहेब यांच्या पुढाकाराणे व्याळा येथील शंभर ऐकराच्या वर शेतातील पिक वाचले. त्याबद्दल व्याळा येथील शेतकरी श्री. यशवंतराव देशमुख, श्री. विलासराव चव्हाण, श्री. प्रकाश नरिंगे, श्री. ज्ञानेश्वर मिटकरी, श्री. गजानन पोटे, श्री. सुरेन्द्र दामोदर, शेख साबीर, श्री. अविनाश जगताप, श्री. संतोष इंगळे, श्री. प्रशांत आये, श्री. अभिषेक काळणे, श्री. बाबुलाल मांगटे पाटिल,श्री. गणेश धर्माळे, श्री. ऋषिकेश मांगटे पाटिल, श्री. रितेश देशमुख, यांनी आमदार साहेब यांचे आभार मानले.....
Post Views: 230