डॉ. रवींद्र आरोग्य सेवा केंद्रात पल्स पोलिओ मोहीम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Mar 2024, 8:50 AM
   

उरुळी कांचन : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम येथे राबविण्यात आली. भारत पोलिओ मुक्त झाला असताना इतर देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. म्हणून शासनाने दक्षतेचा उपाय म्हणून पल्स पोलिओ मोहीम सुरू केलेली आहे. डॉ.रवींद्र भोळे पल्स पोलिओ बुथ येथेही पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य सेविका सीमा चव्हाण, मीरा लिंबोने अंगणवाडी सेविका, मुक्ता दत्तात्रय डोके अंगणवाडी मदतनीस, अतुल गाढवे एम पी डब्ल्यू, यांनीही लसीकरण केले. ह्या बुथवर दोनशे सत्तर पाच वर्षाच्या आतील वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या स्वप्निशा कांचन, दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.उरुळी कांचन प्राथमिक हेल्थ सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे सर यांनी डॉ.रवींद्र भोळे पल्स पोलिओ लसीकरण बूथला भेट देऊन मार्गदर्शन केले. गेली पस्तीस वर्षापासून ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे शासनाच्या विविध सार्वजनिक आरोग्य विषयक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.

    Post Views:  97


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व