आडसूल येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वागीण व्यक्तीमत्व विकास शिबिर संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 May 2022, 5:12 PM
   

तेल्हारा  :  आडसूळ येथिल मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंग चे सर्वागीण व्यक्तीमत्व विकास शिबिर संपन्न झाले. दि 26 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधी मध्ये शिबिर घेण्यात आले. दि 30 एप्रिलला झालेल्या समारोपीय कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद गिर्हे होते. प्रमुख पाहूने आर्ट ऑफ लिव्हिंग चे  VLTP चे विदर्भ समन्वयक रमेश पुंडकर, याआकोला जिल्हा VLTP  समन्वयक गणेश भैया टेमझरे. शिवराजे जामोदे कविराज, अरूण काळे, सौ. सुनिता गिर्हे मॅडम, अमित गिर्हे आदी मान्यवर उपस्थित होते. 

                    सतत पाच दिवस चाललेल्या या शिबिरात विविध मनोरंजनात्मक खेळ, नृत्य, गायन, कथाकथन, अभ्यास कसा करावा. आत्मविश्वास आणि यश, आद्रशमुल्ये आणि जीवन, योगा आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध खेळ आणि प्रकियांच्या माध्यमातून उत्तम जीवन जगण्याचे सुत्रे शिकविण्यात आले. 
                विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभाग घेतला. दरवर्षी शिबिर घेण्यात यावे अश्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरूषोत्तम इंगोले, गणेश नागळे, विठ्ठल महाले, यांनी अथक परिश्रम घेतले.

    Post Views:  378


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व