Breking News : तळीरामांना दिलासा; परदेशी मद्य स्वस्त


 Pankaj Deshmukh  2021-11-20
   

मुंबई : इंधन दरावरील व्हॅट, राज्याचे कर कमी करावेत अशी मागणी होत असताना सरकारने तळीरामांना दिलासा दिला आहे. परदेशातून आयात होणार्‍या स्कॉचवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे स्कॉच-व्हिस्कीवर असलेला उत्पादन खर्चावरील 300 टक्के कर हा 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
राज्य शासनाने याबाबतचा अध्यादेश गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारला परदेशातून आयात केलेल्या स्कॉच-व्हिस्कीच्या विक्रीतून दरवर्षी 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता करात कपात केल्याने या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशी स्कॉच-व्हिस्कीच्या विक्रीतून सरकारला 250 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता आहे. मद्य स्वस्त होणार असल्यामुळे परदेशी स्कॉच-व्हिस्कीचा खप दररोज एक लाख बाटल्यांवरून अडीच लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

    Post Views:  201


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व